Bhandara : ‘रोहयो’ चा उद्देश साध्य, भंडाऱ्यातील 85 हजार मजुरांच्या हाताला मिळाले काम
मजुरांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, काळाच्या ओघात अशा योजनांकडे प्रशासकीय यंत्रणेचे आणि लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होते पण भंडारा जिल्ह्याने इतिहास घडवून दाखवला आहे. मजुरांच्या हाताला काम देण्यात हा जिल्हा राज्यात अव्वल राहिलेला आहे.
भंडारा : मजुरांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात (Water Conservation) जलसंधारणाची कामे करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, काळाच्या ओघात अशा (Scheme) योजनांकडे प्रशासकीय यंत्रणेचे आणि लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होते पण भंडारा जिल्ह्याने इतिहास घडवून दाखवला आहे. मजुरांच्या हाताला काम देण्यात हा (Bhandara District) जिल्हा राज्यात अव्वल राहिलेला आहे. योजनेची जनजागृती आणि जलसंधारणाची कामे असा दुहेरी उद्देश येथील जिल्हा प्रशासनाने साधला आहे. जिल्ह्यात योजनेच्या माध्यमातून 1 हजार 122 कामे झाली आहेत तर तब्बल 85 हजार 509 मजुरांच्या हाताला काम मिळालेले आहे. रोजगार निर्मितीचे 100 टक्केचे उद्दीष्ट साधण्यासाठी तालुका स्तरावरील यंत्रणा व गावकरी जोमाने कामाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.
2 लाख 72 हजार कुटुंबाची नोंदणी
रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन हे कामाला लागले आहे. यामुळे सरकारचा उद्देश साध्य होत असून गावचा विकास होत आहे. भंडारा जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली असून मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. या योजनमध्ये जिल्ह्यातील 2 लाख 72 हजार 340 कुटुंबियांची नोंदणी करण्यात आली आहे. तर वर्षभरात 2 लाख 31 हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या जिल्ह्यातील 85 हजार 509 मजूर हे रोजगार हमी योजनेच्या कामावर रुजू आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेमध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे.
गावस्तरावर कोणती कामे?
गाव शिवाराच जलसंधारणाची कामे करुन पाणीपातळीत वाढ व्हावी या उद्देशाने माती-नाला बंडींग, बांध-बंधिस्ती, नाला दुरुस्ती यासारख्या कामाचा रोहयो मध्ये समावेश होतो. यामध्ये मजुरांच्या हाताला तर काम मिळतेच पण शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या पाणीपातळीतही वाढ करण्याचा सरकारचा उद्देश आहे. शिवाय योजनेच्या सुरवातीच्या काळात या माध्यमातून कामेही झाली मात्र, मजुरांना देण्यात येणाऱ्या रोजगाराकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळे आता कामांची संख्याही कमी होत आहे आणि मजुरही इतर पर्याय शोधत आहेत.
मजुरी मात्र अत्यंल्प
रोजगार हमी योजनेचा उद्देश चांगला असला तरी येथील कामावर मजुरी ही अत्यल्प आहे. रोजगार हमी योजनेतील कामावर येणाऱ्या मजुरांना गतवर्षी 238 रुपये रोजंदारी होती तर आता यावर्षी तब्बल 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत हाताला काम असले तरी पोट भरेल एवढाही दाम यातून मजुरांच्या पदरी पडत नाही. काळानुरुप योजनेत बदल झाला नाही.
संबंधित बातम्या :
Weather Report : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
State Government: खरिपापूर्वीच बदलणार मदतीचे निकष, नुकसानभरपाईत नेमक्या त्रुटी काय?
Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!