भाजीपाल्याचे दर घसरले, भंडाऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात

भाजीपाला विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. Bhandara farmers vegetable rates

भाजीपाल्याचे दर घसरले, भंडाऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात
भंडाऱ्यात भाजीपाल्याचे दर घसरले
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 2:29 PM

भंडारा: जिल्ह्यात सध्या भाजीपाल्याचे भाव बाजारात कमी झाले आहेत.भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात भाव मिळत नसल्यानं त्यांचं नुकसान होत आहे. वाग्यांना 5 रुपये किलो, टोमॅटो 2 रुपये किलो इतका भाव मिळतोय. भाजीपाला विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत.(Bhandara farmers facing problems due to low vegetable rates)

युवा शेतकरी अडचणीत

मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी जयकिशन थोटे हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. जयकिशन यांनी ऍग्री मध्ये डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या नादात न पडता त्यांनी शेतामध्येच काहीतरी करावं असा निश्चय करत शेतीमध्ये भाजीपाला पीक लागवड करण्याचा निश्चय केला.. जयकिशन थोटे यांच्याकडे पाच एकर शेती आहे, तीन एकर शेतीमध्ये ते भाजीपाला पीक लागवड करतात.

तीन एकरावर भाजीपाला लागवड

जयकिशन थोटे यांनी 5 एकरपैकी तीन एकरावर वांगे, टोमॅटो, फुलकोबी, पत्ताकोबी, या पिकांची लागवड केली आहे. बाजारात या पिकांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, बाजारात वांग्यांना 5 रुपये किलो टोमॅटो 2 रुपये किलो, पत्तागोबी 5 रुपये किलो, फुलगोबी 10 रुपये किलो इतका भाव मिळत असल्याने जयकिशन थोटे यांच्यासह इतर शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टी आणि महापुराचा फटका

दररोज डिझेलचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतात नांगरट करणे ही परवडत नाही. तरी देखील शेतीमधून आपला प्रपंच चालविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. तर, दुसरीकडे औषधांचे खर्चही दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. कोरोना, महापूर या संकटात सापडलेला शेतकरी कसाबसा सावरत आहे. मोठ्या आशेने भाजीपाला पिकातून आर्थिक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, बाजारात भाजीपाल्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज काढून कशीबशी शेती करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

संबंधित बातम्या:

टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

सांगलीच्या पट्ठ्याची कमाल, पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय ‘लाल भेंडी’ थेट वारणा किनारी

(Bhandara farmers facing problems due to low vegetable rates)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.