भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. Bhandara Vegetable farmer

भाजी विकून भज्याचेही पैसे निघेनात, शेतकऱ्यांनी जगायचं कसं?
भंडाऱ्यातील भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 7:28 PM

भंडारा: कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडतोय. भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती आहे. मालाला भाव मिळत नसल्याने शिवाय कोरोनामुळे मजूर आणि मार्केट उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. (Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

भाजीपाला बांधावर सडत ठेवण्याची वेळ

कोरोना संसर्गात भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाला तोडणीसाठी मजूर मिळत नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मजूर मिळत नसून तसेच भाजीपालाला भाव नसल्याने भाजी विकून भज्याचे पैसेही निघत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

भंडारा जिल्हा तसा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र, अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यास सुरु केले आहे. आधुनिक तंत्रज्ञात व उपलब्ध बाजारपेठ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मागील 6-7 वर्षा पासून भाजीपाला पीक घेऊ लागला. मात्र, कोरोनाच्या संसर्ग वाढू लागला लॉक डाउन लागले व भाजीपाला पिकाला भाव मिळेनासा झाला. एकीकडे लॉकडाऊन लागू होऊन संचारबंदी केल्याने भाजीपाला तोडण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने तोडणी खर्च परवडत नसल्याने भाजीपाला पीक शेताच्या बांधावर सडत ठेवण्याची वेळ जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

वांगी 5 रुपये किलो भेडी 10 रुपये किलो

ठोक दरात वांगी 5 रु किलो,भेंडी दहा रुपये किलो,कारले 12 रु किलो,टोमैटो 4 रु किलो,चवळी 10 रु किलो अशा कमी दरात विकली जात असल्याने दहा किलो वांगी विकुन भजी खाण्याइतके पैसे निघत नसल्याने जिल्ह्यातील भाजीपाला पीक घेणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. तोडणीची मजुरी, वाहतुकीचा खर्च व बाजारातील भाव यांचे गणित लागत नसल्याने शेतात भाजीपाला पिक सडू देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांना नसल्याची परिस्थिती असल्याचं जांब येथील किरण अतकरी या भाजीपाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.

कोरोना संसर्गाचा फटका राज्यातील सर्वच क्षेत्राला बसला असल्याचे चित्र उभे असताना आता त्याची झळ शेतकऱ्यांला बसत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील मदत द्यावी, असं कुँवर श्रीपात्रे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

(Bhandara Vegetable farmer facing economic problem due to lockdown)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.