Success Story | मोती शेतीतून बंपर कमाई, 2 हेक्टरमध्ये 30 लाखांचा फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट

गुजरातच्या शेतकऱ्यानं 2 हेक्टर मोती शेतीतून तब्बल 30 लाखापर्यंत नफा मिळवला आहे. (Pearl Farming oyster production)

Success Story | मोती शेतीतून बंपर कमाई, 2 हेक्टरमध्ये 30 लाखांचा फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट
मोती शेती
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:52 PM

नवी दिल्ली: पारंपारिक शेतीतून नव्या वाटा शोधण्याचं काम देशातील शेतकरी करत आहेत. गुजरातच्या शेतकऱ्यानं 2 हेक्टर मोती शेतीतून तब्बल 30 लाखापर्यंत नफा मिळवला आहे. मोती शेती वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, मात्र हे खर आहे. गुजरातमधील भार्गवभाई देसाईंनी 2 हेक्टरवरील तलावात मोती शेतीकरुन प्रगती साधलीय. देसाईंच्या यशोगाथेचा समावेश भारत सरकारच्या 101 Success Stories to Double the Income of Farmers या पुस्तकात करण्यात आला आहे. ( Bhargavbhai Desai high income and profit in pearl farming oyster production)

भूवनेश्वरमध्ये प्रशिक्षण

भार्गवभाई देसाई गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. चिखलीमधील तालावचोरा गावामध्ये राहणाऱ्या भार्गवभाईंनी काहीतरी नवीन करण्याच्या इराद्यांन मोती शेतीचा मार्ग स्वीकराला आहे. ओडिशाची राजधानी भुवेश्वरमधील सेंट्रल इनस्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर अ‌ॅग्रीकल्चर येथून मोती उत्पादनचं प्रशिक्षण भार्गवभाई देसाईंनी घेतले. मोती उत्पादनाविषयी प्रशिक्षण घेऊन भार्गवभाईंनी त्यांच्या शेतात दोन हेक्टरवर तलाव खोदला आणि ओएस्टरची शेती केली. या सर्वांमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर कऱण्यात आला. ओएस्टरच्या आतून मोती मिळतो. बाजाराच्या तुलनेत डिझायनर्स यांच्याकडून मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. ओएस्टर वाढत असताना त्याचे वेगवेगळे डिझाईन आणि आकाराचे फोटो त्यांनी काढले. यामुळे मोत्याची किमंत 500 रुपयांवरुन वाढून 5 हजारांपर्यंत पोहोचली.

भार्गवभाई देसांईंनी मोत्यापासून ज्वेलरीशिवाय आकर्षक डिझाईनमधील वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. भगवान गणेश, साईबाबा, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माशी संबंधित वेगवेगळ्या प्रतिकांच्या डिझाईन तयार केल्या. पारंपारिक मोती आणि अपारंपारिक पद्धतीनं तयार केलेल्या मोत्यामध्ये फरक असतो. मोती शेतीतून मिळणाऱ्या कल्चर्ज पर्ल्सचा आकार चांगला असतो. भार्गवभाई देसाईंनी याचा विचार करुन एक हेक्टर तलावात 10 ते 12 कल्चर्ड पर्ल्सचं उत्पादन घेतले.

मोती शेतीतून कमाई

2006 मध्ये भार्गवभाई देसाईंना त्यांच्या तलावातून 2 प्राकृतिक मोती मिळाले त्याचा आकार 48 कॅरेट होता. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या मोत्यांना बहरीनच्या ‘द जेम अँड पर्ल टेस्टिंग लॅबोरेटरी’ कडून मान्यता देण्यात आली आहे. त्या मोत्यांची किंमत बाजारात 3 ते 4 कोटी सांगितली जात आहे. मोती शेतीसोबतच भार्गवभाई तलावामध्ये मत्स्यपालन करतात. त्यातून 2 टन मासे मिळतात.

भार्गवभाई देसाईंनी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीनं मोती शेती केली. पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्राचा वापर केल्यानं उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. पारंपारिक पद्धतीमध्ये भार्गवभाई देसाईंना 50 ते 200 मोती मिळायचे. आता नव्या तंत्राच्या सहाय्यानं त्यांना 10 हजार ते 12 हजार मोती मिळतात.

भार्गवभाई देसाईंना पारंपारिक पद्धतीनं मोती शेती करताना प्रति हेक्टरी 50 लाख रुपये खर्च येत होता. आधुनिक पद्धत वापरल्यानं प्रति हेक्टर खर्च 17.50 लाख रुपयांवर आलाय. पारंपारिक शेतीमध्ये भार्गवभाईंना सुरुवातीला 1 लाख रुपयांचा फायदा होत होता. आता त्यांचा फायदा 29 लाखांवर गेला आहे.

संबंधित बातम्या:

झुकिनी…. ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा

( Bhargavbhai Desai high income and profit in pearl farming oyster production)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.