Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस… काय आहे भेंडवळ घट मांडणीतील भाकीत?

बुलढाणा येथे भेंडवळची घट मांडणी झाली आहे. यंदा पेरण्या उशिरा होणार असून राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता या घट मांडणीतून वर्तवण्यात आली आहे. मात्र, यंदा पीक जोरात येणार असल्याचं भाकीतही वर्तवण्यात आलं आहे.

यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस... काय आहे भेंडवळ घट मांडणीतील भाकीत?
Bhendwal Ghat Mandani PredictionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 11:30 AM

बुलढाणा : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळ येथे घट बसवण्यात आले आहेत. तब्बल 350 वर्षाची या घट मांडणीला परंपरा आहे. वाघ महाराजांच्या वंशजाकडून ही घट मांडली केली जाते. त्यात राज्य, देश आणि जगातील वर्षभरातील परिस्थितीवर भाष्य केलं जातं. तसेच राज्यातील पीकपाणी, पाऊस यावरही या घट मांडणीत भाकीत वर्तवलं जातं. यंदाही काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी करून भाकिते वर्तवण्यात आली आहेत. यंदाच्या भाकितानुसार यंदा पेरण्या उशिरा होणार आहेत. मात्र, यंदा पाऊस चांगला होणार आहे. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर यंदा पिके चांगली येण्याची भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे.

पहाटे 6 वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवलं जातं.

हे सुद्धा वाचा

काय आहे यंदाचं भाकीत?

अंबाडी कुलदैवत आहे – रोगराई चे प्रमाण आहे

कपाशी मोघम आहे, फारसी तेजी नसणार.

ज्वारी – सर्वसाधारण येईल, भावात तेजी राहणार.

तूर – मोघम, पीक चांगले येईल.

मूग – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

उडीद – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

तीळ – सर्वसाधारण पीक येईल, नासाडी होईल

बाजरी – पीक साधारण येईल, नासाडी होईल.

भादली – कमी अधिक पीक येईल, रोगराई वाढेल

साळी – चांगले येईल पीक, तेजी असणार

मठ – सर्वसाधारण पीक येईल. तेजी असणार

जवस – नासाडी होणार, तेजी राहणार, पीक चांगले येणार

लाख – तेजी राहणार, सर्वसाधारण पीक येईल

वाटाणा – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

गहू – तेजी राहणार, पीक चांगले राहील

हरभरा – मोघम, काही ठिकाणी चांगले राहील, रोगाने नुकसान होण्याची शक्यता

करडी – संरक्षण खाते म्हणतात याला, पीक चांगले आहे

घागर

पहिला महिना जून – कमी अधिक पाऊस येणार, पेरणी उशीर होऊ शकते

दुसरा महिना जुलै- पाऊस सर्वसाधारण राहील

तिसरा महिना ऑगस्ट – एकदम चांगला पाऊस येणार, अतिवृष्टीची शक्यता

चौथा महिना सप्टेंबर – पाऊस कमी आहे, पण अवकाळी पाऊस पडणार