Nandurbar Market: मिरची बाजारात ‘तेजी’, विक्रमी दर मिळून होईल का नुकसानाची भरपाई?
मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार मार्केटची ओळख आहे. केवळ जिल्ह्यातीलच नाही सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरची बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, बाजारपेठेतले वेगळेच चित्र आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्यानेच लाल मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.
नंदुरबार : मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून (Nandurbar Market) नंदुरबार मार्केटची ओळख आहे. केवळ जिल्ह्यातीलच नाही सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरची बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, बाजारपेठेतले वेगळेच चित्र आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Chilly Market) मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्यानेच (Red Chilly Rate) लाल मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत. ओल्या लाल मिरचीला 8 हजार रुपये तर कोरड्या लाल मिरचीचे दर 17 हजार 500 वर गेले आहेत. दरात वाढ झाली तरी उत्पादन हे निम्म्याहून कमी झाल्याने याचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय भविष्यात मिरचीची आवक घटली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे. उत्पादनात घट झाली तर काय दरावर काय परिणाम होतात याचा प्रत्यय सध्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहे.
बाजारात तेजी, उत्पादनात मात्र घट
मिरचीला विक्रमी दप मिळत असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा असे वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे. कारण उत्पादनात निम्म्याहून अधिकची घट झाली आहे. त्यामुळे विक्रमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ओल्या मिरचीसह वाळलेल्या मिरचीची आवक सुरु झाली आहे. ओल्या लाल मिरचीला बाजार समितीमध्ये कमाल 3 हजार 500 तर किमान 8 हजार 500 असा दर मिळत आहे. हे दर वाढीव असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना याचा अधिकचा लाभ होतोय असे नाही. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे खर्चही अधिक झालेला होता.
1लाख 65 हजार क्विंटल मिरचीची आवक
नंदुरबार ही मिरचीची मुख्य बाजारपेठ आहे. केवळ्या जिल्ह्यातूनच नाही तर सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरचीची आवक होते. शिवाय ओली मिरचीची तोडणी झाली की लागलीच विक्री करावी लागते. त्यामुळे सध्या आवक होत असल्याने आतापर्यंत 1 लाख 65 हजार क्विंटलची आवक झाली आहे. आकडेवारीत ही आवक अधिकची असली तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने भविष्यात याचे परिणाम दिसणार आहे. शिवाय सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांनी वाळलेली मिरची साठवण्यापेक्षा विक्रीवरच भर दिला आहे.
दक्षिण भारतात उत्पादनात घट
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमधूनही मिरचीची आवक होत असते. येथील चोख व्यवहार आणि दराची हमी यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा नंदुरबारकडेच राहिलेला आहे. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणातून कोणत्याच पिकाची सुटका झालेली नाही. त्यामुळे हंगामी पीक असलेल्या मिरची उत्पादनातही मोठी घट झाली आहे. भविष्यात अणखीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या :
कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही