Business Idea : 1000 रुपये किलो विकते हे फळ, एक एकरात शेती केल्यास होईल ६० लाखांचे उत्पन्न
देशातील काही शेतकऱ्यांनी अमेरिकन ब्लूबेरीची शेती सुरू केली आहे. यातून त्यांचे चांगले उत्पन्न होत आहे.
नवी दिल्ली : देशातील शिकलेले लोकं शेतीत इंटरेस्ट घेत आहेत. शेतीच्या पद्धतीत बदल झाले आहेत. युवक आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. धान-गव्हाची शेती करणारे शेतकरी फळबाग लागवड करत आहेत. आंबे, लिची, मशरूम, भेंडी, लवकी, ड्रॅगन फ्रूट आणि स्टॉबेरीसह इतर विदेशी फळ आणि भाजीपाल्याची लागवड करत आहेत. यामुळे शेतीला व्यवसायाचे स्वरूप मिळाले आहे. आता आम्ही तुम्हाला अशी शेती सांगणार आहोत ज्यातून ही शेती करणारे मालामाल होतील.
१ हजार रुपये किलो
तुम्ही ब्लुबेरीची शेती करत असाल तर तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. देशातील काही शेतकऱ्यांनी अमेरिकन ब्लूबेरीची शेती सुरू केली आहे. यातून त्यांचे चांगले उत्पन्न होत आहे. ब्लूबेरी हे महाग विकणारे फळ आहे. ब्लूबेरी १००० रुपये किलो विकतो. अमेरिकन ब्लूबेरीला सुपरफूड मानले जाते. जगात हे फळ लोकप्रीय आहे. परंतु, भारतात याचे उत्पादन खूप कमी घेतले जाते. म्हणून देशात ब्लूबेरी आयात केले जाते.
१० वर्षांपर्यंत घेता येते उत्पादन
भारतात अमेरिकन ब्लूबेरीची शेती केली जाते. शेतकरी यातून लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतात. एक वेळा ब्लूबेरी लावल्यास दहा वर्षांपर्यंत ब्लूबेरीचे उत्पादन मिळत राहते. ब्लूबेरीत बरेच व्हिटॅमीन्स आणि पोषकतत्व असतात. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी ब्लूबेरीचे सेवन केले जाते.
एकरी घेता येते ६० लाखांचे उत्पादन
भारतात एप्रिल, मे महिन्यात ब्लूबेरीच्या रोपांची लागवड केली जाते. दहा महिन्यानंतर याच्या रोपापासून फळ मिळणे सुरू होते. याचा अर्थ फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फळ तोडता येतात. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ब्लूबेरीच्या रोपांची छटाई केली जाते. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ब्लूबेरीला फांद्या फुटतात आणि फूलं लागणे सुरू होते. दरवर्षी छटाई केल्यास उत्पादन क्षमता वाढते. एका एकरात तीन हजार प्लँट लावता येतात. एक रोपापासून दोन किलो ब्लूबेरी मिळू शकते. वर्षाला एक हजार रुपये प्रतीकिलोचा विचार केल्यास ६ हजार किलो ब्लूबेरी विकून शेतकरी ६० लाख रुपयांपर्यंत उत्पादन घेऊ शकतात.