Bogus Seeds : कृषी विभागाच्या कारवाईचा ‘श्रीगणेशा’, खरिपाच्या तोंडावर इस्लामपुरात 23 लाखाचे सोयाबीन बियाणे जप्त

उत्पादनात वाढ होण्यासाठी बियाणे प्रमाणित असणे हे सर्वात महत्वाचे आहे. पण अधिकच्या अर्थार्जनासाठी बियाणे कंपन्या शेतकऱ्यांचा विचार करीत नाहीत. इस्लामपुरात आढळून आलेल्या बोगस बियाणे बॅगवर गरुड सीड्स असे नाव होते तर सोयाबीन केडीए 726 जातीचे बियाणे असा उल्लेख होता. मात्र, गोदामातील साठवलेल्या सोयाबीन बियाणाची तपासणी ही भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी केली.

Bogus Seeds : कृषी विभागाच्या कारवाईचा 'श्रीगणेशा', खरिपाच्या तोंडावर इस्लामपुरात 23 लाखाचे सोयाबीन बियाणे जप्त
बोगस सोयाबीन बियाणे
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:54 PM

सांगली : एकीकडे शेतकरी उत्पादन वाढीसाठी जीवाचे रान करीत आहे तर दुसरीकडे (Bogus Seed) बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. अशाचप्रकारे इस्लापुरात बोगस बियाणांचा साठा केलेल्या गोदामावर (Agricultural Department) कृषी विभागाच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यामध्ये तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचे बोगस (Soybean Seed) सोयबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. गरुड सीड्स या नावाने 25 किलोच्या पिशवीतून हे बियाणे सिलबंद करण्यात येत होते. या प्रकरणी कंपनी मालक प्रणव हसबनीस यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंगामाच्या तोंडावरच असे प्रकार समोर येत असल्याने शेतकऱ्यांनाही सतर्क राहूनच बियाणांची खरेदी करावी लागणार आहे.

ना बिजोत्पादनाचा परवाना, ना सोयाबीन खरेदीच्या पावत्या

उत्पादनात वाढ होण्यासाठी बियाणे प्रमाणित असणे हे सर्वात महत्वाचे आहे. पण अधिकच्या अर्थार्जनासाठी बियाणे कंपन्या शेतकऱ्यांचा विचार करीत नाहीत. इस्लामपुरात आढळून आलेल्या बोगस बियाणे बॅगवर गरुड सीड्स असे नाव होते तर सोयाबीन केडीए 726 जातीचे बियाणे असा उल्लेख होता. मात्र, गोदामातील साठवलेल्या सोयाबीन बियाणाची तपासणी ही भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, बियाणे कंपनीचे मालक प्रणव हसबनीस यांच्याकडे ना बिजोत्पादनाचा परवाना होता ना बिजोत्पादनासाठी खरेदी केलेल्या सोयाबीनच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे हे बियाणे पेरणीसाठी योग्य नसल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी या गोदामाला टाळे ठोकले आहे.

गोदामात साठवले लाखोंचे बियाणे

इस्लामपुरात सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या गोदामावर कृषी विभागाने छापा टाकला. दरम्यान, कागपत्रांची पूर्तता न करता बियाणे विक्रीच करता येत नाही. असे असतानाही गरुड सीड्स या नावाने 25 किलो पिशवाीत सोयाबीनच्या केडीए 726 जातीचे बियाणे सिलबंद करण्यात आले होते. मात्र, कृषी विभागाने यंदा तालुकानिगहाय भरारी पथकांची नेंमणूक करण्यात आली असून इस्लामपुरात सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या गोदामावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 23 लाख 50 हजार रुपयांचे बियाणे ते देखील न प्रक्रिया केलेले होते.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे

खरीप हंगामात बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी लगबग ही सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या घाईगडबडीचाच हे विक्रेत्ये फायदा घेतात. शिवाय काही भागात तर कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दरात विक्री केली जाते. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.