26 वर्षीय इंजिनीअरचा भन्नाट प्रयोग, मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत काळा तांदूळ पिकवला

कोकणातील दापोली येथे जगातील सर्वात महागड्या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे.

26 वर्षीय इंजिनीअरचा भन्नाट प्रयोग, मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत काळा तांदूळ पिकवला
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 1:10 PM

रत्नागिरी : जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोलीत शेती करण्यात आली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Brown Rice farming in Dapoli)

दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या 26 वर्षीय युवकाने आपल्या शेतात या काळ्या तांदळाची शेती केली आहे. अभिषेक हा करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. मात्र आता तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दापोलीत आला आहे.

अभिषेकने दापोलीत स्थायिक झाल्यावर आपली वडिलोपार्जित असणारी शेती करण्याचा निर्णय घेतला व आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. अभिषेक हा मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

लॉकडाऊनचा काळात त्याने पत्रव्यवहार करून काळ्या तांदळाच्या बियाणे पुरवठादार व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी साडेतीनशे रुपये किलो दराने काळ्या तांदळाचे बियाणे अभिषेकला कुरीअरद्वारे पाठवले. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे अभिषेकला हे बियाणे मिळायला तीन महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धेअधिक बियाणे खराब झाले. उरलेले बियाणे अभिषेकने लावले. आज अभिषेकच्या दारात या काळ्या तांदळाची शेती बहरली आहे.

काळ्या तांदळाला मोठ्या शहरात तसेच परदेशात मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा तांदूळ 400 ते 500 रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री 399 रुपये प्रतिकिलो दराने सुरू आहे, असे अभिषेकने सांगितले.

कोकणात उकडीचे तांदूळ, गावठी तांदूळ, बासमती, सुवर्णा, कोलम अशा अनेक प्रकारच्या तांदळाची शेती केली जाते. आता अभिषेकसारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने काळ्या तांदळाची शेती करायला सुरुवात केली आहे. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ (ब्लॅक राईस) हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फारच फायदेशीर आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. असे अनेकजण सांगतात.

हा तांदूळ खाल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात येते. या तांदळात मोठ्या प्रमाणात फायबर आहे. सोबतच अँटी ऑक्सीडेंट तत्व असल्याने हा तांदूळ डोळ्यांसाठीदेखील उपयुक्त आहे. त्यामुळे भारतातच नव्हे तर विदेशातूनदेखील या तांदळाला मोठी मागणी असल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे.

संबंधित बातम्या

20 गुंठ्यांवर टोमॅटोची लागवड, 6 लाखावर उत्पन्न, मनमाडच्या शेतकऱ्याची कमाल

शिरुरमध्ये काश्मीर! ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड

(Brown Rice farming in Dapoli)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.