शेतकऱ्याचं अनोखं दातृत्व, मुक्या जनावरांसाठी मोफत चाराछत्र सुरु

जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. Shankar Deshmukh Free Fodder

शेतकऱ्याचं अनोखं दातृत्व, मुक्या जनावरांसाठी मोफत चाराछत्र सुरु
शंकर देशमुख, शेतकरी
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 4:03 PM

बुलडाणा: शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त चिंतेत असतो तो चाराटंचाईमुळे पाळीव जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. परंतु, पाण्याची कमतरता असल्याने हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे चारा उपलब्ध असला आणि कितीही जास्त किमतीत असला , त्या किमतीत हा चारा शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी विकत घ्यावा लागतो. त्याचा खर्चही खूप मोठा होतो. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सवडद या गावात एक शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून पंचक्रोशीतील जनावरांसाठी मोफत म्हणजेच निशुल्क चारा देतोय. (Buladana Farmer Shankar Deshmukh provide free fodder for pet animals in villages)

नेमका उपक्रम काय?

सवडद गावातील शेतकरी शंकर देशमुख त्यांच्याकडे जवळपास 25 एकर जमीन आहे. चांगलं उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून यांची परिसरात ओळख आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे दरवर्षी जनावरांना हिरव्या चाऱ्याची सोया होत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी शंकर रावांनी स्वतः निर्णय घेतला. पंचक्रोशीतील सर्वच जनावरांना आपण मोफत हिरवा चारा देऊ अशी गाठ बांधली. एकूण जमीन क्षेत्रापैकी आपल्या दहा एकर शेतीमध्ये देशमुख हे मका किंवा ज्वारीसारखे पीक लावतात. पीक बरोबर अगदी उन्हाळ्यात मोठं होऊन तोडणीला येतत्यातून ते उत्पन्न न घेता पंचक्रोशीतील जनावरांना चारा उपलब्ध करून देतात.

शंकर देशमुख यांच्या शेतामध्ये आजूबाजूच्या गावखेड्यातील शेतकरी आपापले जनावरे आणून बांधतात आणि चारा पाण्याची सर्व सोय शंकर देशमुख करतात… शेतीतून नेहमीच उत्पन्न घेतल्यापेक्षा मुक्या जनावरांना निदान उन्हाळ्यात हिरवा चारा मिळावा, यापेक्षा कोणतं कार्य मोठं नाही , असं देशमुख मोठ्या मनाने म्हणतात.

मोफत चारा उपक्रमाचा 100 जनावरांना लाभ

शंकर देशमुख शेतकऱ्याने सुरू केलेल्या उपक्रमामुळे मोफत चाऱ्याची व्यवस्था झाल्याने इतर शेतकरीही खुश झालेत. सध्या या ठिकाणी 100 च्या वर जनावरे चारा पाण्यासाठी येतात.आणि हा आकडा असाच वाढत जातो. कुणाची 2 तर कुणाची 10 जनावरे असतात. परंतु, शंकर देशमुखांच्या शेतात आणून सोडले की त्यांची चिंता करायची गरज पडत नाही, त्यामुळे देशमुख यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा असे शेतकरी म्हणतात. तर हा चारा वाया जाऊ नये म्हणून गावातील उद्धव देशमुख यांनी चाऱ्याची कुट्टी करण्याची मशीन ही उपलब्ध करून दिलीय. शेतकरी शंकर देशमुख आणि त्यांचे भाऊ सुद्धा या कामात त्यांना मदत करतात. परिसरातल्या शेतकर्यांनी या दोघांचे आभार मानले.

संबंधित बातम्या:

राजकीय हवा बदललीय, भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात; अनिल देशमुखांचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपनं आत्मचिंतन करावे; अनिल देशमुखांचं टीकास्त्र

(Buladana Farmer Shankar Deshmukh provide free fodder for pet animals in villages)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....