लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची केळी फेकण्याची वेळ, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा

लॉकडाऊन असल्यानं बबन त्रिकाळ यांच्यापुढे पाऊण एकर शेतातली केळी कशी विकायची असा प्रश्न निर्माण झालाय. (Banana Farmer corona lockdown)

लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची केळी फेकण्याची वेळ, नुकसान भरपाईसाठी आत्मदहनाचा इशारा
केळी उत्पादक अडचणीत
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 5:38 PM

बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गामुळं विविध क्षेत्रांना फटका बसलेला आहे. राज्यात कोरोना पन्हा वाढत असल्यानं काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आलेय. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विश्वी येथील शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनाही याचा फटका बसलाय. लॉकडाऊन असल्यानं बबन त्रिकाळ यांच्यापुढे पाऊण एकर शेतातली केळी कशी विकायची असा प्रश्न निर्माण झालाय. केळी विकता येत नसल्याने जागेवरच गळून जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. (Buldana Banana farmers facing problems due to Corona and lockdown)

शासनानं भरपाई द्यावी

विश्वी येथील बबन त्रिकाळ यांनी केळीचं लाखो रुपयांचे नुकसान होतेय. त्यामुळे त्रिकाळ यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केलीय. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. बुलडाणा जिल्ह्याच्या विश्वी येथील शेतकरी बबन त्रिकाळ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी त्यांच्या पाऊण एकरात केळीची लागवड केली होती.

लॉकडाऊन असल्यानं केळी विक्री संकटात

बबन त्रिकाळ यांनी आता केळी काढायला सुरुवात करणार होतो. मात्र, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे केळी विक्री करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व्यापारीही भाव पाडून मागत आहेत, त्यामुळे खर्च ही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

केळी जागेवर पडून आर्थिक नुकसान

केळी जागेवरच खराब होऊन पडत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बबन त्रिकाळ यांनी त्यांच्यावर बँकेचे कर्ज असून ते कर्जबाजारी झाले आहेत. त्रिकाळ यांनी खासगी सावकाराकडून उसणवारीनं पैसे घेतले आहेत. केळी पिकाची शासनाने विल्हेवाट लावावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा मजबुरीने आत्मदहन करेन, अशा प्रकारचे निवेदन शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनी मेहकर तहसीलदार यांना दिले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळं शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालीय. वास्तविक पाहता या साऱ्या समस्यांमध्ये “शेतकरी आणि शेती क्षेत्रावर”सर्वाधिक विपरीत परिणाम झालेला आहे.

संबंधित बातम्या

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

(Buldana Banana farmers facing problems due to Corona and lockdown)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.