APMC MARKET KHAMGAV : या कारणामुळे तुरीच्या दरात चढ उतार, वातावरणातील बदलामुळे उत्पादनाला फटका, शेतकरी वर्ग चिंतेत
या धुक्यामुळे मात्र शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. तर या दाट धुक्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजाराची शक्यता बळवली असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावत असल्याची चर्चा सुरु आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : राज्यातील बाजारात (Buldhana Market) सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC MARKET KHAMGAV) मागील आठवडाभरात बाजारात तुरीची सर्वाधिक 62 हजार 377 क्विंटल आवक झाली. त्यावेळी बाजारात सर्वाधिक 7 हजार 350 रुपये दर मिळाला आहे. गतवर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले होते, त्यामुळे बाजार समितीत आवक पण चांगली होती, परंतु यंदा तुरीचे पिक (toor dal rate) फुलत असताना वातावरणात झालेल्या बदलाने फुलगड झाली. त्याचबरोबर सिंगापूर करणाऱ्या अडीनेही आक्रमण केल्याने तुरीच्या उत्पन्नात घट झाली आहे अशी माहिती मुकुटराव भिसे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी दिली.
पश्चिम विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले बुलढाणा शहर धुक्यात हरवून गेले होते. तर आजही मोठ्या प्रमाणात बुलढाणा शहराने धुक्याची चादर पांघरली होती, धुक्याची तीव्रता अधिक असल्याने वाहनधारकांना भरदिवसा वाहनांचे दिवे लावून वाहने चालवावी लागत आहेत. तर कृषी हवामान तज्ञांच्या मते पुढील तीन दिवस धुके राहण्याची शक्यता आहे.
या धुक्यामुळे मात्र शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. तर या दाट धुक्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजाराची शक्यता बळवली असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावत असल्याची चर्चा सुरु आहे.