VIDEO | रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने 7 एकरातल्या संत्रा बागेचं नुकसान, कोसळलेलं संकट कोण दुर करणार ?
लोणार तालुक्यातील कारेगाव येथील विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्यांच्या 7 एकर संत्रा बागेत या रेड माईट नावाच्या रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची संपूर्ण बागेचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक ही नुकसान देखील झाले आहे.
गणेश सोलंकी, बुलढाणा : जिल्ह्यातील (Buldhana Orange Farm Damage) संत्रा बागांवर रेड माईट (Red Mite) रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. बुलढाणा (Buldhana, jalgaon, sangrampur, lonar) जिल्ह्यात जळगाव, संग्रामपूर, लोणार परिसरातील ही घटना आहे. विशेष म्हणजे यावर्षी संत्रा बागेवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 7 एकरातील संत्र्यांची फळे काळी पडली आहेत. संत्र्यांची फळं काळी पडल्यामुळे कोणत्याही व्यापारी ती फळं घ्यायला तयार नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, संग्रामपूर, लोणार परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी यांच्यावर मोठं संकट ओढावलं आहे. संत्रा बागांवर रेड माइट नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्यांची फळे काळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे व्यापारी संत्र्याची फळं घ्यायला तयार नसून संत्र्याची फळं तशीच पडून आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लोणार तालुक्यातील कारेगाव येथील विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्यांच्या 7 एकर संत्रा बागेत या रेड माईट नावाच्या रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने संत्र्याची संपूर्ण बागेचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक ही नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत.