बैलगाडा शर्यतीच्या परवानगीमुळे संस्कृतीचे जतन अन् ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीही
बैलगाडी शर्यत हा केवळ विरंगुळा आणि स्पर्धेपुरता मर्यादित खेळ राहिलेला नाही. मध्यंतरी प्राणीमित्र संघटनेने बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जाते, अशी भूमिका मांडल्याने शर्यतींवर बंदी घातली होती. पण आता शेतकरी हे मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतात हे पटवून दिल्यानंतर पुन्हा बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेत शिवारामध्ये बैलगाडी शर्यत स्पर्धा पार पडू लागल्या आहेत.
यवतमाळ : (Bullock cart race)बैलगाडी शर्यत हा केवळ विरंगुळा आणि स्पर्धेपुरता मर्यादित खेळ राहिलेला नाही. मध्यंतरी प्राणीमित्र संघटनेने बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जाते, अशी भूमिका मांडल्याने शर्यतींवर बंदी घातली होती. पण आता शेतकरी हे मुलांप्रमाणे बैलांची काळजी घेतात हे पटवून दिल्यानंतर पुन्हा बैलगाडी (Permission to race) शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेत शिवारामध्ये बैलगाडी शर्यत स्पर्धा पार पडू लागल्या आहेत. असा शंकरपट हा (Yavatamal) जिल्ह्यातील बाभुळगाव येथे पार पडला आहे. हा यवतमाळ जिल्ह्यातील पहिलाच शंकरपट होता. वेग आणि अत्यंत कमी कालावधीत अंतर कापण्याच्या या बैलगाडा शर्यतीला पुन्हा रंगत येत आहे. केवळ करमणूकच नाही तर यामुळे ग्रामीण भागच्या अर्थकारणावर याचा विविध अंगाने परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे खिलार बैलजोडीला पुन्हा गतवैभव मिळू लागले आहे.
खंडीत झालेली परंपरा पुन्हा सुरु
उच्च न्यायालयाने बंदी उठवल्याने गावोगावी शंकरपटाचा थरार अनुभवता येत आहे. बाभुळगाव येथे श्रीमंत शिवाजी महाराज समितीच्या वतीने शंकरपट भरवला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदोत्सव साजरा करीत आहेत. राज्यामध्ये बैलगाडीच्या शर्यती लोकप्रिय आहेत. मात्र, मध्यंतरी ही शर्यतीची परंपरा खंडीत झाली होती. पण पुन्हा अटी-नियमांसह बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून राज्यभर बैलगाडा स्पर्धा सुरु झाल्या असून ग्रामीण भागाच्या संस्कृतीचे दर्शन घडू लागले आहे. पुन्हा शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला पोहचला असून स्पर्धेच्या माध्यमातून एक नवा उत्साह संचारला जात आहे.
खिल्लार बैतजोडीला पुन्हा मागणी
बैलगाडा शर्यतीसाठी खिल्लार बैलांना वेगळेच महत्व आहे. ही बैलजोडी शेती कामाला नाही तर केवळ बैलगाडा शर्यतीला असते. शेतकऱ्यांना त्यांच्या बैलजोडी ची नेमकी किंमत किती हे देखील कळत नव्हते. शंकरपटामध्ये पटावर लावणाऱ्या बैलजोडीला शेतकरी स्वत:च्या मुलाप्रमाणे जीव लावत होते. ही बैलजोडी कधीच शेतीत राबत नाही. त्यांचा खुराक वेगळाच असतो. त्यामुळे हौशी शेतकऱ्यांकडून शर्यतीसाठी पडेल त्या रकमेला बैलजोडीची खरेदी केली जाऊ लागली आहे. त्यामुळे बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील अर्थकारणावर असा ‘हा’ परिणाम
शंकरपटाच्या आयोजनामागे ग्रामीण भागातील शेतीचे अर्थकारही चालते. शर्यतीचे आयोजनाच्या निमित्ताने, लावण्यात आलेली दुकाने, जसे की बैलांना सजविण्याच्या वस्तू विकणारे, शेतीसाठी उपयोगी वस्तू विकणारे, चहा-पाण्याची हॉटेल्स चालविणारे, बैलांच्या धावण्याचा ट्रॅक तयार करणारे, बैलांची वाहतूक करणारे, चारा विकणारे अशा अत्यंत छोटे व्यवसाय चालविणाऱ्यांचा उदरनिर्वाह यातून होतो. शेतकऱ्यांकडे असलेला आर्थिक प्रवाह या गरीब कामकरी लोकांकडे पोहोचतो. या निमित्ताने गावातील अनेकांना तरुणांना रोजगार दखील उपलब्ध होत असतो.
संबंधित बातम्या :
Lemon Production: मागणी वाढली अन् उत्पादन घटलं, नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावलं
Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार