अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

संकटे आली की चोहीबाजूने येतात याचा प्रत्यय सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बागा उध्वस्त झाल्या आहेत तर द्राक्ष घडावरही याचा परिणाम झाला होता. मात्र, ऊसावर याचा परिणाम झाला नव्हता. मात्र, नुकसान व्हायचेच असेल तर ते टळत नाही. असाच प्रकार येवला तालुक्यातील दहेगाव-पाटोदा शिवारात घडला आहे.

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!
येवला तालुक्यातील दहेगाव-पाटोदा शिवारातील एक एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:16 AM

लासलगाव : संकटे आली की चोहीबाजूने येतात याचा प्रत्यय सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून (Untimely Rain) अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बागा उध्वस्त झाल्या आहेत तर (Grape) द्राक्ष घडावरही याचा परिणाम झाला होता. मात्र, ऊसावर याचा परिणाम झाला नव्हता. मात्र, नुकसान व्हायचेच असेल तर ते टळत नाही. असाच प्रकार येवला तालुक्यातील दहेगाव-पाटोदा शिवारात घडला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण झाले आणि त्याची ठिणगी (Sugarcane Damage) ऊसाच्या फडामध्ये पडली आणि अवघ्या काही वेळेत 1 एकरातील ऊस जळून खाक झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवारात वीज तारा ह्या लोंबकाळात असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्नही ठरले व्यर्थ

सध्या ऊस हा तोडणीला आलेला आहे. असे असतानाही वेळेत तोड होत नाही या समस्येला शेतकरी सामोरे जात आहे. कालावधी उलटूनही ऊसतोड न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. हे कमी म्हणून की काय एका ठिणगीमुळे सुनील माणिकराव जाधव यांचा एक एकरातील ऊस जळून खाक झाला. आग लागताच शेतकऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोसाट्याचे वारे असल्याने अवघ्या काही वेळात एकरातील ऊस या आगीने कवेत घेतला होता. क्षेत्र कमी असले तरी या उत्पादनावरच जाधव यांच्या शेतीचे भवितव्य ठरणार होते.

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम

ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे. ऊस लागवड करुन 15 महिने उलटले तरी तोड ही झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहेच पण ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढल्या असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक असले तरी हेच नुकासनीचे ठरत आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही 15 ते 20 टक्के ऊसतोड शिल्लक आहे.

अशी मिळवा महावितरणकडून मदत

महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात. यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

Rabi Season : वातावरण निवळले आता सुगी जोमात, मजूर टंचाईवर शेतकऱ्यांचा ‘हा’ रामबाण उपाय..!

राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.