गावामध्ये कमी खर्चात मोठी कमाई मिळवून देणारे 5 व्यवसाय, शहराकडं न जाता कामाला लागून मिळवा मोठा नफा

मोठ्या शहरांमध्ये काम मिळतं पण हव्या तेवढ्या प्रमाणात आर्थिक बचत होत नाही. five business in villages

गावामध्ये कमी खर्चात मोठी कमाई मिळवून देणारे 5 व्यवसाय, शहराकडं न जाता कामाला लागून मिळवा मोठा नफा
money
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 2:17 PM

नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात अनेकजण मोठ्या शहराची वाट धरतात. मोठ्या शहरांमध्ये काम मिळतं पण हव्या तेवढ्या प्रमाणात आर्थिक बचत होत नाही. कारण ज्यावेळी आपण आपलं गाव किंवा छोटं शहर सोडून मोठ्या शहरात पोहोचतो त्यावेळी आपल्यासमोर नवे खर्च उभे राहतात. त्यामध्ये तुम्हाला घरभाड्यापासून अनेक गोष्टीसांठी पैसा खर्च करावा लागतो. यामुळे गावातचं राहून स्वत:चा व्यवसाय केल्यास स्वत:च्या प्रगतीसोबत इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन देता येतो. यामध्ये दूध संकलन आणि विक्री, गायी आणि म्हैसपालन, माती परीक्षण, मेडिकल, डेअरी, बी-बियाणं विक्री दुकानं यासारखे व्यवसाय सुरु करता येतील. (Business ideas you can start these five business in villages and get good return)

दूध संकलन आणि विक्री

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करायचं. ते शीतगृहात स्टोअर करायचं आणि मोठ्या दूध उत्पादक संघांना विकायचं याला बल्क मिल्क कुलर देखील म्हटलं जातं. याद्वारे एक प्लांट उभारता येईल, त्यामध्ये दूध खराब होण्यापासून वाचवता येते. त्यानंतर ते शहरातील मोठ्या दूध डेअरींना विकता देखील येते. यासाठी तुम्हाला तुमच्या गावातून दूध खरेदी करावी लागेल आणि डेअरी, कंपनी किंवा शहरात विक्री करावी लागेल. बल्क मिल्क कुलर प्लाँट साठी सरकार देखील मदत करते.

माती परीक्षण व्यवसाय

केंद्र सरकारनं माती परीक्षणसाठी सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरु केली आहे. याद्वारे गावामध्ये माती परीक्षण प्रयोगशाळा टाकू शकता. इथे शेतातील मातीचं परीक्षण करता येते. देशात ग्रामीण भागात माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा कमी प्रमाणात आहेत. माती परीक्षण करुन शेतकऱ्यांना आवश्यक तो सल्ला देता येतो. केंद्र सरकारकडून एक सॉईल हेल्थ कार्ड जारी करण्यासाठी 300 रुपये अनुदान दिलं जाते.

दूग्ध व्यवसाय

गावात राहून करता येण्यासारखा हा देखील चांगला व्यवसाय आहे. यासाठी तुमच्याकडे चांगल्या गायी आणि म्हशी असणं आवश्यक आहे. दूध डेअरीला किंवा थेट ग्राहकांना विक्रीकरुन तुम्ही चांगला नफा कमवू शकता. याशिवाय दूधापासून विविध उपपदार्थ देखील बनवून विक्री करु शकता.

बी-बियाणं दुकाने

शेतकऱ्यांना वर्षभर विविध कारणासाठी बी-बियाणे आणि खते आवश्यक असतात. हा तसा जुना व्यवसाय आहे पण गावांमध्ये नव्यानं सुरु करता येऊ शकतो. गावात चांगल्या प्रकारे बी-बियाणे विक्री दुकान चालवून कमाई करता येऊ शकते.

मेडिकल स्टोअर

मेडिकल स्टोअर हा असा व्यवसाय आहे जो आपण कुठेही सुरु करु शकतो. यामध्ये फक्त चांगली कमाईच होत नाही तर नियमित ग्राहक मिळतात. फार्मसींचं शिक्षण घेतल्यानंतर मेडिकल स्टोअर देखील सुरु करता येते.

संबंधित बातम्या:

PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार

Gold Price Today | सोन्याने गाठला 48 हजारांचा टप्पा, सलग तिसऱ्या दिवशीही भाव वाढ, जाणून घ्या नवे दर

(Business ideas you can start these five business in villages and get good return)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.