सरकार शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रशिक्षण देणार, गावात कंपनी सुरु करुन मोठी कमाई करा, वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येक गावामध्ये शेणापासून रंग बनवण्याचा उद्योग सुरु करण्याचा मानस आहे. cow dung paint
नवी दिल्ली: केंद्रीय मध्यम व लघू उद्योग मंत्रालय शेणापासून रंग करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येक गावामध्ये शेणापासून रंग बनवण्याचा उद्योग सुरु करण्याचा मानस आहे. शेणापासून वेगवेगळे रंग बनवण्यासाठी एक प्लांट उभारण्यासाठी 15 लाखांचा खर्च येतो. नितीन गडकरींचं स्वप्न पूर्ण झाल्यास गावातून शहराकडे रोजगारासाठी वाढणारा लोंढा कमी होऊ शकतो. (Business opportunity start cow dung paint factory in your village by investment of rupees 15 lakh)
शेणापासून बनवलेला रंग लाँच
नितीन गडकरी यांनी 12 जानेवारी 2021ला खादी ग्रामोद्योग आयोगानं शेणापासून बनवलेल्या पेंटचे लाँचिंग केलं होतं. त्यावेळी गडकरी यांनी हा रंग इकोफ्रेंडली, विष रहित असल्याचं म्हटलं होते. भारतीय प्रमाणीकरण संस्थेकडून शेणापासून बनवलेल्या रंगाला प्रमाणित करण्यात आलं आहे. मध्यम आणि लघू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या माहितीनुसार नितीन गडकरींनी शेणापासून रंग बनवण्यासाठी प्रेरणा दिली होती. जयपूर येथील कुमरप्पा नॅशनल हँडमेड पेपर इनस्टिट्यूटने यातील पेटंट मिळवलं आहे. शेणामध्ये शिसे, पारा, क्रोमियम, आर्सेनिक आणि कॅडमियम याचा वापर केला आहे.
जयपूरमध्ये प्रशिक्षण
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणस्नेही रंगांची बाजारात मागणी वाढली आहे.सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. 350 जण प्रतीक्षा यादीत असल्याची देखील माहिती आहे. हे प्रशिक्षण 7 दिवसांचे असते. आगामी काळात ट्रेनिंगमधील सुविधा वाढवण्याचा विचार असल्याचं गडकरी म्हणाले. यामुळे गावागावातील लोक शेणापासून रंग बनवण्याची कंपनी स्थापन करु शकतात.
‘शेणापासून पेंट तयार करणार’
“शेणापासून पेंट तयार करायचं, ही नवी योजना आहे. शेणापासून ऑईलपेंट आणि डिस्टम्बर तयार केलं जाणार. विशेष म्हणजे मार्केटमध्ये जितके पेंट आहेत त्यापेक्षा हे पेंट चांगलं आहे. मी स्वत: माझ्या घरी हे पेंट लावलं आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, तुम्हीदेखील हे पेंट वापरा. आता तर या पेंटसाठी वेटिंगलिस्ट सुरु झालीय. विशेष म्हणजे 550 रुपयांचं पेंट अवघं 225 रुपयांत मिळेल”, अशी माहिती त्यांनी दिली.
‘पेंटसाठी शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार’
“प्रत्येक गावात एक 15 लाखांची पेंटची फॅक्ट्री असावी, असं माझं स्वप्न आहे. पेंटसाठी जे शेण असेल त्याला 5 रुपये किलो भाव मिळणार. माझ्या घरी 25 जनावरं आहेत. गाय, बैल, म्हैस आहेत. मला त्यातून कमीतकमी 300 किलो शेण मिळेल. त्यातून मला 1500 रुपये दररोजचे मिळतील. जर फक्त 1500 रुपये शेणाचे मिळतील तर 30 दिवसात तब्बल 45 हजार रुपये फक्त शेणातून मिळतील. ज्याच्याकडे दोन-तीन गाय, म्हैस आहेत त्यांना आठ-दहा हजार रुपये महिन्याचे फक्त शेणापासून मिळतील. मग कोण गरीब राहील? सगळ्यांना रोजी रोटी मिळेल”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांची कमाई वाढणार
शेणापासून बनवलेल्या पेंटची विक्री वाढल्यानंतर गावामध्ये शेणाची खरेदी केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 30 हजार रुपये शेणाच्या विक्रीतून मिळू शकतात. सध्या शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतात. मात्र, रंगाच्या कंपन्या निर्माण झाल्यानंतर हे चित्र बदलणार आहे.
सीएनजी ट्रॅक्टरमुळे वाढणार शेतकऱ्याचे उत्पन्न, जाणून घ्या शेतकऱ्याला होणारे फायदेhttps://t.co/FsWyToyXa4#CNGTractor |#bestoption |#diesel |#farmer
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या:
गायीचं शेण 5 रुपये किलोनं विकलं जाणार, गडकरींची मोठी घोषणा, वाचा सविस्तर रिपोर्ट
फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे!, वाचा गडकरींचे भन्नाट फटके आणि आयडिया
Business opportunity start cow dung paint factory in your village by investment of rupees 15 lakh