भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्याचे बदलले दिवस, रोज दहा हजार रुपयांचे उत्पन्न
शेतकरी आशुतोष रॉय यांनी सांगितले की, मार्च महिन्यात त्यांनी बाजारातून बी आणून लावले. पेरणी करण्यापूर्वी शेतीची नांगरणी केली.
नवी दिल्ली : शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही शेतकरी पारंपरिक शेतीचे आधुनिकीकरण करतात. तर काही शेतकरी वेगळी वाट निवडतात. भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याची ही सक्सेस स्टोरी. बिहारच्या बक्सर जिल्ह्याचे शेतकरी परंपरातगत शेतीसह भाजीपाल्याची शेती करत आहेत. यातून शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत चांगला फायदा होत आहे. शेतकरी एकाच शेतीत वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड करत आहेत. यातून आशुतोष राय एक चांगले शेतकरी झाले. त्यांनी दोन बिघा जमिनीत दोडके आणि काकडीची शेती केली. ते सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून ते भाजीपाल्याची शेती करत आहेत. हिरवा भाजीपाला विकून ते चांगले उत्पन्न घेतात.
न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, शेतकरी आशुतोष राय यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि आजोबा पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यातून खर्च जास्त आणि फायदा कमी होत होता. परंतु, त्यांनी आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड केली. भाजीपाला आणि फळबाग लागवड सुरू केली. यात कमी खर्चात फायदा जास्त झाला. ते सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेतात. त्यामुळे त्यांचा भाजीपाला बाजारात लगेच विकतो.
सुमारे दोन महिने हिरव्या भाजीपाल्याची विक्री
मार्च महिन्यात त्यांनी बीज टाकून दोडके आणि काकडीची लागवड केली. सहा फूट अंतरावर दोडके लावले. मध्यंतरी काकडी लागली. मध्यंतरी पिकांना पाणी देतात. त्यामुळे दोन महिन्यात भाजीपाल्याची विक्री सुरू झाली.
भाजीपाल्याच्या शेतीत जास्त फायदा
आशुतोष रोज १० रुपये किलोच्या भावाने दोडके विकत आहेत. यातून त्यांना रोज दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शिवाय काकडी विकूनही चांगली कमाई करत आहेत. एक एकर जमिनीत भाजीपाला लागवडीचा खर्च सुमारे २० हजार रुपये येतो. शिवाय कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. तरीही भाजीपाला शेतीत चांगले उत्पन्न मिळते.
दैनंदीन जीवनात भाजीपाला लागतो. तो विक्री करून चांगले पैसे कमवले जाऊ शकतात. त्यामुळे भाजीपाला लागवड करून शेतकरी चांगली प्रगती करू शकतात. त्यासाठी नियमित मेहनत करावी लागते.