Parbhani : यंदाच्या हंगामात क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचे गाळप, ऊस उत्पादकांवर मात्र चिंतेचे ढग कायम

गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे तर आता पावसालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कारखाने नाईलाजास्तव का होईना बंद करावेच लागणार आहेत. गेल्या 6 महिन्यात जिल्हाभरातील 6 साखर कारखान्याने तब्बल 40 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे.

Parbhani : यंदाच्या हंगामात क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचे गाळप, ऊस उत्पादकांवर मात्र चिंतेचे ढग कायम
अतिरिक्त ऊसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 12:14 PM

परभणी : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामा अनेक अंगाने चर्चेचा विषय ठरला आहे. चार महिने सुरु राहणार हंगाम यंदा 7 महिने उलटले तरी सुरुच आहे. असे असतानाही (Maharashtra) राज्यात ऊस गाळपापेक्षा शिल्लक उसाचीच चर्चा अधिक राहिली आहे. अखेर पावसाला सुरवात झाल्यामुळे राज्यातील  (Sugar Factory) साखर कारखाने आता बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावणारच आहे. असे असले तरी परभणी जिल्ह्यामध्ये यंदा रेकॉर्डब्रेक असे 40 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 लाख मेट्रिक टनाने गाळप वाढले आहे. असे असले तरी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे.

दोन दिवसांमध्ये कारखाने होणार बंद

गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे तर आता पावसालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कारखाने नाईलाजास्तव का होईना बंद करावेच लागणार आहेत. गेल्या 6 महिन्यात जिल्हाभरातील 6 साखर कारखान्याने तब्बल 40 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. कधी नव्हे ते जिल्ह्याच ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. ऊसाचे क्षेत्र अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचे गाळप होणे शक्य झाले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही ही परस्थिती ओढावली आहे.

अतिरिक्त उसाचे काय?

साखऱ आयुक्तालयाच्या सूचनांप्रमाणे राज्यभऱातील साखर कारखान्यांनी गाळप सुरु ठेवले होते. अतिरिक्त उसाचा वाढीव आकडा येताच इकडे गाळपाचा कालावधीही वाढत गेला. त्यामुळे 4 महिन्याच संपुष्टात येणार हंगाम 6 महिने तर सुरुच राहिला पण तरीही ऊसाचा संपूर्ण प्रश्न मार्गी लागलेला नाही. आता पावसाला सुरवात झाल्याने ना तोड शक्य आहे ना हार्वेस्टर शेतामध्ये जातेय. त्यामुळे अतिरिक्त उसाच्या बाबतीत सरकार काय धोरण राबवतंय हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

6 कारखान्यांची धुराडी सुरु

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी साखर कारखान्यांनी त्यांची भूमिका पार पाडली आहे. गाळप हंगाम तर लांबलाच पण क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप साखर कारखान्यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात 6 साखर कारखान्यांच्या माध्यमातून तोड सुरु होती. आता 6 महिन्यानंतर गाळप बंद होणार असले तरी साखर कारखान्याचे प्रयत्न पुरते कामी आले नाहीत हेच खरे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.