Nanded : पीक पध्दतीमध्ये बदल अन् उत्पादनात वाढ, नांदेडच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!

इकळीमोर येथील गणपत मोरे यांनी हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन त्यानंतर हरभरा आणि आता तीळाचे पीक घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळोवेळी मशागतीची कामे केल्याने हे शक्य झाले आहे. शिवाय आहे पाणी म्हणून त्याचा अपव्यय न करता योग्य व्यवस्थापन करुन त्यांनी ही पीके जोपासली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अशातच गणपत मोरे यांनी जो अभिनव उपक्रम केला आहे

Nanded : पीक पध्दतीमध्ये बदल अन् उत्पादनात वाढ, नांदेडच्या शेतकऱ्याने करुन दाखवलं!
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने एका वर्षात तीन पिकांचे उत्पादन घेतले आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 10:11 AM

नांदेड : पारंपरिक पीक पध्दतीने दिवसेंदिवस (Production) उत्पादनात घटच होते. मात्र, काळाच्या ओघात शेती (Crop Change) पध्दतीमध्ये बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. (Nanded) जिल्ह्यातील इकळीमोर येथील शेतकऱ्याने वर्षभरात एक नाही..दोन नाही तर तीन पीके घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे. पोषक वातावरण आणि मुबलक पाणी असल्यावर काय होते हे गणपत मोरे यांनी दाखवून दिले आहे. हंगमानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करुन तीन पिकांचे उत्पादन तर घेतलेच आहे पण ते ही सरासरीपेक्षा अधिक. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये त्यांनी राबवलेला उपक्रम हा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे कुणाच्या मार्गदर्शानाशिवाय त्यांनी हा प्रयोग केला आणि यशस्वीही करुन दाखविला.

एका वर्षात तीन पिकांचे उत्पादन

इकळीमोर येथील गणपत मोरे यांनी हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन त्यानंतर हरभरा आणि आता तीळाचे पीक घेतले आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि वेळोवेळी मशागतीची कामे केल्याने हे शक्य झाले आहे. शिवाय आहे पाणी म्हणून त्याचा अपव्यय न करता योग्य व्यवस्थापन करुन त्यांनी ही पीके जोपासली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अशातच गणपत मोरे यांनी जो अभिनव उपक्रम केला आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एकच पीक पध्दतीमुळे नुकसान

शेतीमध्ये अधिकचा खर्च जरी करता आला नाही तर पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनात वाढ शक्य आहे. बारमाही एकच पीक घेतले तर जमिनीचा पोत खराब तर होतोच पण दिवसेंदिवस उत्पादनात घट होते. या सर्व बाबींचा अनुभव मोरे यांना आला होता. त्यामुळेच पाण्याची उपलब्धता पाहता त्यांनी हा उपक्रम केला. शिवाय तिन्हीही पिके जोमात तर होतीच पण अधिकचे उत्पादनही त्यांना मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

तीळाला एकरी 10 क्विंटलचा उतारा

तीळ पिकाकडे शेतकऱ्यांचे तसे दुर्लक्ष असते. पण गणपत मोरे यांनी अंतिम टप्प्यात तीळाची निवड केली. योग्य मशागत आणि पाण्याचे नियोजन केल्याने त्यांना एकरी 10 क्विंटल उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय तीळाला अधिकचा दर असल्याने सर्वात जास्त तीळातून फायदा झाल्याचे त्यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.