Bhandara : पीक पध्दतीमध्ये बदल, धान शेतीला मकाचा उत्तम पर्याय, कमी खर्चात अधिकचे उत्पादन

धान पीक हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. या पिकावरच येथील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, काळाच्या ओघात आता येथील शेतकरीही पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. रब्बी हंगामातील मका हा धान पिकाला सक्षम पर्याय उभा राहत असून गेल्या दोन वर्षापासून हा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धान शेतीवर कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे.

Bhandara : पीक पध्दतीमध्ये बदल, धान शेतीला मकाचा उत्तम पर्याय, कमी खर्चात अधिकचे उत्पादन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 3:25 PM

भंडारा :  (Paddy Crop) धान पीक हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. या पिकावरच येथील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, काळाच्या ओघात आता येथील शेतकरीही पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. रब्बी हंगामातील (Maize Crop) मका हा धान पिकाला सक्षम पर्याय उभा राहत असून गेल्या दोन वर्षापासून हा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धान शेतीवर (Pest outbreak) कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे. धान शेतीमध्ये अधिकचा खर्च अन् उत्पादन कमी अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार हा बदल केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी मक्याचे उत्पादन घेतले गेल्याने अजून क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पादन

पाण्याची उपलब्धता असल्यावर मक्याचे उत्पादन पदरी पडतेच शिवाय या पिकावर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव हा जाणवत नाही. त्यामुळे खर्चही कमी होतो. जिल्ह्यातील लाखनी, साकोली तालुक्यात मक्याचे क्षेत्र वाढत आहे. चार महिन्यांमध्ये हे पीक पदरात पडते. शिवाय अधिकच्या मशागतीचीही गरज नाही. एकरी 30 ते 35 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याने धान शेतीला हा उत्तम पर्याय उभा राहत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यावर कमी खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

धान पिकासाठी मूबलक पाणी

धान पिकांमध्ये सर्वाधिक भात शेतीचा सहभाग आहे. याकरिता पाण्याची आवश्यकता तर आहेच पण दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलामुळे किडीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात धान शेतीसाठी तर अधिकचे पाणी लागते. त्यामुळेच भाताचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणत मक्याचे उत्पादन झाले होते.त्यामुळे मका शेतकऱ्यांना धान पिकाला चांगला पर्याय म्हणून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.

शासकीय मदतही वेळेत नाही

निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी धान शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना थेट बोनस द्यायचा की एकरी मदत यावरच अजून एकमत झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी झालेली आहे. या सर्व बाबींना त्रासून शेतकरी आता पीक पध्दतीमध्येच बदल करीत आहेत.

संबंधित बातम्या  :

Success Story : अतिरिक्त ऊसाचा प्रश्नच बनला शेतकऱ्यांच्या उद्योगाचे कारण..! वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Latur Market : सोयाबीन-हरभरा आवकमध्ये सातत्य, आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर काय ?

अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे परराज्यात शेती घेण्याची नामुष्की, आता तर शेती सोडून देण्याची वेळ,नेमके कारण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.