Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 ‘किसान ड्रोन’ला हिरवा झेंडा

काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे स्वरुपही बदलत आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढवून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. त्याच अनुशंगाने शेती व्यवसयात 'ड्रोन'चा वापर वाढवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाच्या विविध भागातील 100 किसान ड्रोनच्या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला आहे.

Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 'किसान ड्रोन'ला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 100 ठिकाणच्या 'किसान ड्रोन यात्रेला' हिरवा झेंडा दाखवला
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 2:27 PM

मुंबई : काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे स्वरुपही बदलत आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढवून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा (Central Government) केंद्र सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. त्याच अनुशंगाने शेती व्यवसयात ‘ड्रोन’चा वापर वाढवला जाणार आहे. (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाच्या विविध भागातील 100 किसान (Drone Farming) ड्रोनच्या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला आहे. एवढेच नाही ड्रोन वापरासाठी सरकारचा पूर्णपणे पाठिंबा राहणार असून भारत या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व करेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. देशात सध्या 100 हून अधिक ड्रोन-स्टार्टअप कार्यरत आहेत. अवघ्या काही दिवसांमध्येच ही संख्या हजारोंच्या घरात जाईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. ड्रोन हे एक तंत्रज्ञान असून त्याचा शेती व्यवसायात तर उपयोग होणारच आहे पण इतर क्षेत्रातही वापर वाढवून या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

भारताकडून ‘ड्रोन’ क्षेत्रामध्ये घडेल क्रांती

ड्रोनचा वापर हा युध्दांमध्ये किंवा तंत्र देशाच्या सीमेवरच वापरले जाते असा एक समज होता. काळाच्या ओघात या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. भारतात ड्रोन मार्केटची एक नवीन इकोसिस्टम विकसित होत आहे. यामुळे तरुणांना रोजगार तर मिळणार आहेच पण ड्रोन क्षेत्राचा नवा उद्य हा भारतामध्येच होणार आहे. अशा नव्या उपक्रमाला केंद्र सरकारचे कायम पाठबळ राहणार आहे. देशात गरुड एरोस्पेसने एक लाख ड्रोन विकसित करण्याचा निर्धार केला आहे. या कंपनीला शुभेच्छा आणि यामाध्यमातून हजारो य़ुवकांना तंत्रज्ञाबाद्दल शिक्षण घेता येत असल्याचेही मोदी यांनी सांगितले आहे. उद्योगांसाठी कोणता अडथळा तर नाहीच पण केंद्र सरकारची योग्य ती धोरणे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘ड्रोन’च्या माध्यमातून शेती व्यवसयात अमूलाग्र बदल

मानसेर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 100 हून ड्रोन स्टार्टअपला हिरवा झेंडा दाखवला. शिवाय ऑनलाईन उपस्थित असलेल्या शेतकरी आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी होणार असून योग्य वेळी शेतीकामे होणार आहेत. याचा उत्पादनवाढीवर परिणाम होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. किसान ड्रोन सुविधाने शेती क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला आहे आणि ड्रोन तंत्रज्ञानासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नियती साफ ठेवल्यानेच विकास साध्य

योग्य भावनेने काम हाती घेतले तर काय होते याचे उत्तम उदाहरण हे ‘ड्रोन’ शेती आहे. यापूर्वी ड्रोनचा वापर म्हणजे केवळ सशस्त्र दलांसाठी आणि शत्रूंशी लढण्यासाठी असतात अशी एक कल्पना होती. पण हे धोरण स्वीकारताना कोणताही विलंब केला नाही. याचा वापर आता उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा मध्ये या मोहिमेला सुरवात झाली आहे. केवळ शेतीसाठीच नाही तर दुर्गम भागात लस पोहचवण्यासाठी देखील वापर झाला आहे. अर्थसंकल्पात ड्रोन शेतीबाबत केलेल्या घोषणांची लवकरच पूर्तता करुन शेती व्यवसयात ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव केंद्राचा ‘आधार’, हरभऱ्याचा दरही फायनल अन् नोंदणीलाही सुरवात

सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात तरी शेतकरी संभ्रमात, दर वाढूनही काय समस्या ?

Onion Rate : कांद्यामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, वाढीव दरावर निर्णय काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.