मुंबई : खरीप हंगामातील नियोजनापेक्षा यंदा (Chemical Fertilizer) रासायनिक खताचा पुरवठा आणि वाढत्या दराचीच अधिकची चर्चा आहे. आता (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्यामुळे (Fertilizer Provide) खताचा पुरवठा होणार की नाही शिवाय झाला तरी वाढत्या दराचा काय परिणाम होणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. पण निर्माण झालेल्या परस्थितीवर (Central Government) केंद्र सरकारने चांगला तोडगा काढला असून शेतकऱ्यांना पुरवठा तो देखील कमी किंमतीमध्ये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच रासायनिक खताच्या अनुदान रकमेत वाढ करण्यात आली आहे. यंदा खतावर 60 हजार 939 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे दरवाढ झाली तरी त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार नाही.
IFCO ही सरकारी मालकीची खताची कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाच्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे साहजिकच खताचे दरही वाढणारच आहेत पण ही कंपनी खताचे दर वाढवणार नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शेतकऱ्यांचा विचार करीता खत दरवाढीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये याची खबरदारी केंद्र सरकारने घेतली आहे.
-बाजारात युरिया खताची किंमत 50 रुपये प्रति बॅग (४५ किलो) आहे.
-डीएपी कंपोस्टची किंमत रुपये 1 हजार 350 रुपये प्रति बॅग (50 किलो) एनपीके रुपये 1 हजार 470 रुपये प्रति बॅग (50 किलो)
-एमओपी खताची किंमत रु 1 हजार 700 रुपये प्रति बॅग (50 किलो)
आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजारात खताची किंमत खूपच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती जास्त असल्याने सरकार शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देते.जेणेकरून देशातील शेतकरी खते खरेदी करू शकतील. अनुदानाशिवाय खताच्या अशा आहेत किंमती
-युरिया खताची किंमत 2450 रुपये प्रति बॅग आहे
-डीएपीची किंमत 4073 रुपये प्रति बॅग आहे
-NPK खताची किंमत 3291 रुपये प्रति बॅग
-एमओपी कंपोस्ट रु.2654 प्रति बॅगमध्ये उपलब्ध आहे.
केवळ रासायनिक खतावर शेती म्हणले शेत जमिनीचे आरोग्यही धोक्यात येते. त्यामुळे रासायनिक खताला जैविक खताची जोड द्यायची. त्यामुळे खर्चातही बचत होते शिवाय उत्पादन वाढीवर परिणाम हा होतोच. पण काळाच्या ओघात रासायनिक खताचा वापर घटला तर दुहेरी फायदा होईल. एक तर उत्पादनात वाढ आणि होणारा खर्चही टळला जाणार आहे.