Washim : रासायनिक खतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच शेणखताची बॅग, वाशिममध्ये मनसे ‘स्टाईल’ आंदोलन

कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन किंवा लिंकिग पध्दतीने खत विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असचतानाच आता कृषी केंद्रातूनही लूट केली जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Washim : रासायनिक खतासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच शेणखताची बॅग, वाशिममध्ये मनसे 'स्टाईल' आंदोलन
रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा भासवला जात असल्याने मनसे च्या वतीने वाशिममध्ये आंदोलन करण्यात आले.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:51 PM

वाशिम : सध्या खरीप पेरणीपेक्षा अधिकची चर्चा आहे ती (Chemical Fertilizer) रासायनिक खत आणि बोगस बियणांची. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवायाही झाल्या आहेत. शिवाय कारवाईच्या अनुशंगाने (Agricultural Department) कृषी विभागाने तालुकानिहाय भरारी पथकाची नेमणूक केली आहे. असे असूनही वाशिम जिल्ह्यात कृत्रिम खत टंचाई केली जात आहे. साठा असूनही शेतकऱ्यांना धारेवर धरले जात आहे. (Washim) वाशिममध्ये मनसेने मात्र आपल्या स्टाईलने आंदोलन केले आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांना शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आंदोलना दरम्यान केली आहे. त्यामुळे आता तरी प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ज्यादा दराने खताची विक्री

कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन किंवा लिंकिग पध्दतीने खत विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असचतानाच आता कृषी केंद्रातूनही लूट केली जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

डफडे वाजून जिल्हाधिकाऱ्यांना शेणखताची बॅग

खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खत गरजेचे आहे. असे असताना येथील कृषी सेवा चालकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करुन रासायनिक खताच्या बॅग अधिकच्या दराने विकल्या जात आहेत. याबाबत मनसेच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढले आहेत. पण याकडे जिल्हा प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिल्याने गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवले तर शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

खताचा कृत्रिम तुटवडा, शेतकऱ्यांची कोंडी

जिल्ह्यातील खरीप क्षेत्राप्रमाणे रासायनिक खताचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. असे असताना तुटवडा भासतोच कसा असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याचा फायदा कृषी केंद्र चालक घेत आहेत. कृषी विभागाने नेमलेल्या भरारी पथकाचा वचक या कृषी सेवा केंद्रावर राहिलेला नाही. त्यामुळे अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.