नांदेड : मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने नागवेली पान मळ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. नागवेली पान मळ्यांसह अन्य पिकांनाही जोरदार फटका बसला. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाची शेतातच नासाडी झाली तर शेतमालाला कवडीमोल दर मिळाला. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. परंतु आता सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे. नागवेली पानाची मागणी वाढल्याने पान विड्याला लाली आली आहे. (Chewing Leaf nagveli Demand After Maharashtra unlock)
दुष्काळ आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील शेतकरी नागवेली पानाची लागवड करतात नागवेली पान मळ्यातून वर्षाकाठीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते मात्र कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद असल्याने नागवेली पानाची मागणी बंद झाली होती. परंतु मागील आठवड्यापासून राज्यात अनलॉक करण्यात आल्याने नागवेली पानाची मागणी वाढली असून 50 ते 60 रुपये शेकडा पान विकलं जात आहे.
लॉकडाऊनमध्ये नागवेली पानाला कवडीमोल दर मिळू लागला होता पान तोडणाऱ्या मजुरांची मजुरी सुद्धा निघत नव्हती. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पान तोडणी बंदच केली होती पान तोडणीस येत नसल्याने पान वाळून जात होते. लग्न सराईत नागवेली पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु लग्न सराईतच लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभ बंद होते. म्हणून पानाला मागणीच नव्हती परंतु अनलॉक झाल्याने नागवेली पानाला मागणी वाढली आहे .
अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील पान श्रीरामपूर ,परभणी ,जळगांव , नाशिक , नगर, नागपूर आणि गुजरात मधील मोठ्या शहरात पाठवले जाते मात्र लॉकडाऊनमुळे हीच शहरे बंद असल्याने नागवेली पानाची मागणीच बंद झाली होती मात्र पुन्हा शहरे अनलॉक झाल्याने नागवेली पानाची मागणी वाढली आहे.
(Chewing Leaf nagveli Demand in After Maharashtra unlock)
हे ही वाचा :
बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा
एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग