चिकनच्या किमती दिवसेंदिवस का वाढत आहेत? नेमकं कारण काय?
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर भारतातील चिकन व्यावसायिकांना एका अफवेमुळं मोठा फटका बसला होता. chicken price in India
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर भारतातील चिकन व्यावसायिकांना एका अफवेमुळं मोठा फटका बसला होता. त्यावेळी जवळपास 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान पोल्ट्री आणि चिकन व्यावसायिकांना भोगावं लागलं होतं. सध्या भारतात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु आहे. मात्र, सध्या चिकनच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. चिकनचे दर वाढण्यामागे कोंबडयांना देण्यात येणाऱ्या खाद्यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. सोयाबीनची मळणी केल्यानंतर जे भुसा राहतो त्याचा वापर कोंबड्यांच खाद्य म्हणून केला जातो. ( chicken price in India day-by-day going up what is reason )
कोंबडी खाद्य म्हणून सोयाबीनच्या भुशाचा वापर
पोल्ट्री व्यावसायिक कोंबडी खाद्य म्हणून सोयबीनच्या भुशाचा वापर मोठ्याप्रमाणात करतात. सोया मीलच्या किमतीतमध्ये 50 टक्के वाढ झाली आहे. तर, कोंबडी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या इतर खाद्यांच्या किंमतीमध्ये 80 टक्के वाढ झाली आहे. यामुळे महिनाभरात चिकनच्या किंमती 32 टक्के वाढल्या आहेत.सोयाबीनची मळणी केल्यानंतर जो पदार्थ शिल्लक राहतो त्याला सोया मील म्हणतात. याचा वापर पशुखाद्य म्हणून देखील केला जातो.
चिकनच्या किंमती का वाढत आहेत?
पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांच्या माहितीनुसार कोंबडी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची किंमत गेल्या महिन्यात 30 ते 40 रुपयांवर होती. ती आथा 60 रुपयांच्या वर गेली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हाय प्रोटीन सोया मील 52 रुपयांना विकलं जातं होते ते आता 67 रुपयांना विकलं जातं आहे. या कारणामुळे चिकनच्या किमती वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळं पशुखाद्य पुरवणाऱ्यांचं गेल्या आर्थिक वर्षात 26 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. उत्तर भारतात बाजारात चिकन170 ते 180 रुपये किलोंना विकलं जात आहे. होळीच्या दिवसांमध्ये चिकन 200 ते 220 रुपये किलो प्रमाणं विकलं जात होतं.
West Bengal Election 2021 : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी https://t.co/39cL4gLKge @narendramodi @BJP4Bengal @BJP4India @MamataOfficial @AITCofficial #WestBengalElections #WestBengalElection2021 #NarendraModi #MamataBanerjee #BJP #TMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या
Weather Report : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधारांनी शेतकऱ्यांचं नुकसान
( chicken price in India day-by-day going up what is reason )