Chilly Prices : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, साताऱ्यात लवंगी मिरचीचा तडका

अतिवृष्टी आणि बदलेल्या वातावरणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला असला तरी मिरचीच्या केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही तर बाजारपेठेत आवक वाढूनही दर हे चढेच आहेत. बाजारात शेतीमालाची आवक वाढली की दर कमी होणार हे सुत्रच आहे पण याला देखील मिरचीने छेद दिला आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे.

Chilly Prices : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, साताऱ्यात लवंगी मिरचीचा तडका
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 12:54 PM

सातारा : अतिवृष्टी आणि बदलेल्या वातावरणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला असला तरी (chilly prices) मिरचीच्या केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही तर (Satara Market) सातारा बाजारपेठेत आवक वाढूनही दर हे चढेच आहेत. बाजारात शेतीमालाची आवक वाढली की दर कमी होणार हे सुत्रच आहे पण याला देखील मिरचीने छेद दिला आहे. यापूर्वी नंदुरबार बाजारपेठेत विक्रमी दर मिळाला होता तर आता सातारा बाजारपेठेत लवंगी मिरचीच्या दरात तब्बल 80 रुपयांची वाढ झालेली आहे. दर वाढूनही मागणी वाढत आहे हे विशेष.

सातारा बाजारपेठेत 4 प्रकारच्या मिरचीचा ठसका

आता सर्वच बाजारपेठेत मिरच्यांची आवक सुरु झाली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी मिरचीची आवक वाढत आहे. असे असले तरी दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. शिवाय दरात वाढ होत आहे. लवंगी मिरचीच्या दरामध्ये तर 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे यंदा मागणीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. सातारा बाजारपेठेत बेडगी मिरची 320 रुपये किलो, शंकेश्वरी मिरची- 200, गटूर मिरची- 165, लवंगी मिरची 180 ते 200 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

अवकाळीचा परिणाम पण आवकमध्ये वाढच

अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मिरची तोडल्यानंतर वाळवण करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण याचा थेट परिणाम हा उत्पादनावर झालेला नाही. यापूर्वी नंदुरबार बाजारात चालू महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच

नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवकही आणि दरही विक्रमीच मिळत आहे. लगतच्या राज्यातील शेतकरी देखील याच बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 लाख टन लाल मिरचीची आवक झाली आहे. तर दरही 4 हजार क्विंटलपर्यंत मिळालेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार असला तरी मात्र, गेल्या अनेक दिवसानंतर कोणत्या तरी शेतीपिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. येथील बाजारपेठेमध्ये दर हे गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. शेतकऱ्यांना येथील दराबाबत खात्री असल्यानेच आवक वाढत असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Grape : अखेर ठरंल तर मग…! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना

आंबा बागांचे नुकसान होऊनही फळपीक विमा योजनेकेडे बागायतदारांची पाठ, काय आहेत कारणे?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.