Basmati Rice : कमी खर्चात अधिकचे उत्पादन, योग्य वाणांची निवड केली तरच मोबदला अन्य घाटा
रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाल्यास उत्पादनात तर वाढ होतेच पण पीक जोपासण्यासाठीचा खर्चही कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. यावर मात करण्यासाठी पुसा संशोधन संस्थेने तीन बासमती तांदळाच्या वाणाची निर्मिती केली आहे.
मुंबई : सध्याच्या (Kharif Season) खरीप हंगामात धान पिक हे देशातील मुख्य पीक आहे. यामध्येच (Rice) तांदूळ हे निर्यातीच्या दृष्टीने महत्वाचे असून पेरणी दरम्यानच शेतकऱ्यांनी (New varieties of basmati rice) योग्य वाणाची निवड केली तर अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्या वाणाचा तांदूळ निर्यात होतो त्याचीच लागवड आणि जोपसणा ही महत्वाची राहणार आहे. शेतकऱ्यांनी जुन्या वाणांची निवड केली तर त्यावर (Pest outbreak) किडीचा प्रादुर्भाव तर होणारच आहे उत्पादनातही घट होते. त्यामुळे साहजिकच कीटकनाशकांचा वापर करावा ज्याचा परिणाम शेतीमालाच्या दर्जावर होतो. त्यामुळे कमी खर्चात अधिकचे उत्पादन हवे असेल तर शेतकऱ्यांना राईसची राणी म्हणून ओळख असणाऱ्या तांदळाची निवड करावी लागणार आहे. बासमतीमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव असणाऱ्या वाणांचा समावेश आहे. पण शेतकऱ्यांनी रोगप्रतिबंधक वाणांची पेरणी करण्याचे आवाहन बासमती एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रितेश शर्मा यांनी केले आहे. रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असे वाणच नसते पण त्याचा निर्यातीवर काही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे.
या तीन बासमती वाणाला होणार नाही किडीचा प्रादुर्भाव
रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाल्यास उत्पादनात तर वाढ होतेच पण पीक जोपासण्यासाठीचा खर्चही कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. यावर मात करण्यासाठी पुसा संशोधन संस्थेने तीन बासमती तांदळाच्या वाणाची निर्मिती केली आहे. ज्यामुळे कीटकनाशकाचा वापर करावा लागणार नाही. या वाणाला कमी खर्च, कमी खत आणि पाणी लागते. योग्य व्यवस्थापनानंतर उत्पादनातही वाढ होते.
पुसा बासमती-1885
पुसा बासमती हा त्यापैकीच एक वाण आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. या वाणाची लागवड 10 जून ते 5 जुलैपर्यंत करता येते. तर हेक्टरी सरासरी 50 क्विंटल एवढे उत्पादन मिळते. पुसा बासमती 1121 या वाणाचे ते सुधारित वाण आहे.हे बीएलबी आणि ब्लास्ट रोगप्रतिबंधक वाण आहे. पेरणीपासून 5 ते 6 महिन्यात हे पीक पदरात पडते.
पुसा बासमती 1847
एकसारखी असलेली हे वाण उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. या पुसा बासमती 1847 या वाणाची लागवड ही 15 जून ते 10 जून या कालावधी केली तर फायद्याचे राहणार आहे. पुसाच्या 1509 या वाणामध्ये सुधारणा करुन या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये या वाणातून पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडते. तर सरासरी 60 क्विंटल हे सरासरी उत्पादन मिळते. या वाणामध्येही बीएलबी आणि मान-ब्रेक रोग घेणार नाही.
पुसा बासमती 1886
भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या या जातीपैकी पुसा 1886 हे एक महत्वाचे वाण आहे. हे वाण 1401 मध्ये विकसित करुन त्याचा वापर केला जात आहे. यामध्ये देखील रोगराईचे प्रमाण हे कमी राहणार आहे. त्यामुळे हे देखील चांगले वाण असून लागवड केल्यापासून 5 महिन्यांमध्ये उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.