Coconut Farming : काय सांगता? मराठवाड्यातही नारळाच्या बागा, कृषी तज्ञांनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..!
मराठवाड्यासारख्या दुष्काळी आणि आवर्षनाच्या क्षेत्रात नारळाच्या बागा...हे जरा अवास्तव वाटतंय ना. कारण नारळाच्या बागा म्हणलं की आपल्या समोर येतो तो कोकण विभाग. येथील थंड वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे येथे नारळाच्या बागा बहरत आहेत. पण मराठवाड्यातही नारळाची लागवड करण्यासाठी वाव असल्याचे खुद्द नारळ विकास बोर्डानेच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर करण्याचे आवाहन नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. अमेय देबनाड यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद : (Marathwada) मराठवाड्यासारख्या दुष्काळी आणि आवर्षनाच्या क्षेत्रात नारळाच्या बागा…हे जरा अवास्तव वाटतंय ना. कारण नारळाच्या बागा म्हणलं की आपल्या समोर येतो तो कोकण विभाग. येथील (Cold Environment) थंड वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे येथे नारळाच्या बागा बहरत आहेत. पण मराठवाड्यातही (Coconut cultivation) नारळाची लागवड करण्यासाठी वाव असल्याचे खुद्द नारळ विकास बोर्डानेच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर करण्याचे आवाहन नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. अमेय देबनाड यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर त्याअनुशंगाने औरंगाबाद विभागातील मंडळाच्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन याबाबत जनजागृती केली आहे.
अशा पध्दतीने घ्या नारळाचे उत्पादन..
कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी तेथील वातावरण पोषक असणे गरजेचे आहे. शिवाय वातावरणानुसार वाण ठरवले तर उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. हीच पध्दती नारळ विकास बोर्डाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देलेली आहे. शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर येथील शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. लागवडीनंतर 5 वर्षात उत्पादन सुरु करण्यासाठी वर्षातून तीन वेळा संतुलीत खताची मात्रा द्यावी लागणार आहे. यामध्ये 50 किलो कंपोष्ट खत, अडीच किलो युरिया, 3 किलो सुपर फॉस्फेट, दीड किलो पोटॅश हे विभागून द्यावे लागणार आहे. नारळ हे एक कल्पवृक्ष आहे त्यानुसार 22 ते 23 किलो कंपोस्ट खत द्यावे लागणार आहे.
महिला शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे
शेती व्यवसयाचा खरा भार हा महिला शेतकऱ्यांच्या खांद्यावरच आहे. त्यामुळे आशा वृक्ष लागवडीकडे त्यांनीच लक्ष दिले तर नारळाचे क्षेत्र वाढणार आहे. शिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनाच प्राधान्य आहे. योग्य व्यवस्थापन केले तर मराठवाड्यातही नारळाची शेती सहज शक्य आहे. त्यामुळे सुरवातीला कमी प्रमाणातच लागवड करुन नारळ वाढीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा सल्ला डॉ. अमेय देबनाड यांनी दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातही नारळाच्या बाग क्षेत्र वाढले तर आश्चर्य नाही पण यासाठी आवधी लागणार हे नक्की
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा ‘आधार’, गायीच्या दूधदरात अखेर वाढ?
Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला