गारठा वाढणारच : रब्बी पिके अन् फळबागांच्या संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

थंडी तशी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असते. दरवर्षी याच वातावरणाचा पीक वाढीसाठी फायदा होत असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर काय होते याचा प्रत्यय यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांची आणि फळबागांची अवस्था पाहून येत आहे. फळबागांवर या वातावरणाचा विपरीत परिणाम झाला आहे.

गारठा वाढणारच : रब्बी पिके अन् फळबागांच्या संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:25 AM

नंदुरबार : थंडी तशी (Rabi season) रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असते. दरवर्षी याच वातावरणाचा पीक वाढीसाठी फायदा होत असतो. पण त्याचा अतिरेक झाला तर काय होते याचा प्रत्यय यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांची आणि फळबागांची अवस्था पाहून येत आहे. (Orchard) फळबागांवर या वातावरणाचा विपरीत परिणाम झाला आहे. उत्पादन घटण्याचा धोका आता अधिक गडद होत आहे. त्यामुळे ऐन फळपीक पदरात पडताना आणि रब्बी हंगामातील पिके बहरात असताना शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे महत्वाचे आहे. शिवाय अजून 5 दिवस अशाच वातावरणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना होणे गरजेचे आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे तो (Agronomists) कृषितज्ञांच्या सल्ल्याचा.

असे करा फळबागांचे संरक्षण..

उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट सुरु झाली आहे. शिवाय अजून काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पपई आणि केळीचा बागांची काळजी घेणे गरजेचे आहे. केळीच्या घडांना प्लास्टिक पेपर ने आच्छादन करावे तसेच बागांना रात्रीचे पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. बागांमध्ये शकोटी करावी त्यामुले उबदार वातावरण होते. त्याचा फायदा बागांना होतो त्याच सोबत होणारे दुष्परिणाम टळले जाता. या काळात आपल्या बागांची काळजी घेणं महत्वाचे असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. पद्माकर कुंदे यांनी ‘tv9 मराठी’ शी बोलताना सांगितले आहे.

रब्बी पिकांची अशी घ्या काळजी

रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असली तरी तापमान 9 अंश सेल्सिअस च्या खाली गेले तर त्याचा परिणाम गहू हरभरा आणि रब्बी ज्वारीच्या पिकावर होत आहे. थंड वातावरणात गहू आणि ज्वारी वर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे त्या साठी निंबोणी अर्काची फवारणी करावी त्याच सोबत हरभरा पिकावर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला डॉ. कुंदे यांनी दिला आहे. रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच वातावरणात झालेला बदल थेट उत्पादनावर परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे आताच योग्य ती खबरदारी घेतली तरच अपेक्षित उत्पादन मिळणार आहे.

हरभऱ्यावरील घाटीअळीचे असे करा व्यवस्थापन

घाटीअळीचा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिहेक्‍टर एच. एन. टी 250 रोगग्रस्त यांचा अर्क फवारा वा याकरिता अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणी पण टाकून हे द्रावण एक मिलि प्रति लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी हे फवारणी पिक शेतात प्रथम आणि द्वीतीय अवस्थेत असताना केल्यास अतिशय प्रभावी होते. त्यामुळे वेळेत आळीचा बंदोबस्त होतो तर पिकाच्या वाढीतील अडथळाही दूर होतो.

संबंधित बातम्या :

Positive News: तुरीची दमदार एन्ट्री : आवकही वाढली अन् दरही, आठवड्याभरातच बदलले चित्र

काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर

दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडकण्याचा धोकाही वाढला

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.