Osmananbad : कृषी योजनांची पूर्तता, 3 कोटी बक्षीस अन् शेत शिवाराचं रुपडं बदलण्यासाठी राबतंय जिल्हा प्रशासन
चांगल्या कामाची दखल ही घेतलीच जाते. त्यामुळेच आज खरीप हंगामात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे सहज शक्य झाले आहे.त्याचे झाले असे उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश हा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये आहे. निती आयोगअंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये या जिल्ह्याने उल्लेखनीय काम केल्यामुळे जिल्ह्यास 3 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते.
उस्मानाबाद : चांगल्या कामाची दखल ही घेतलीच जाते. त्यामुळेच आज (Kharif Season) खरीप हंगामात (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे सहज शक्य झाले आहे.त्याचे झाले असे उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश हा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये आहे. निती आयोगअंतर्गत (Agricultural Department) कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये या जिल्ह्याने उल्लेखनीय काम केल्यामुळे जिल्ह्यास 3 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. आता या बक्षीस रकमेतून जिल्हा प्रशासनाने अत्याधुनिक यंत्राची खरेदी केली असून त्याचा उपयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. याचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याला 3 कोटीचे बक्षीस
निती आयोग अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या होत्या. यामध्ये सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ करणे, प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात विमा संरक्षण क्षेत्रात वाढ करणे अशा महत्वाच्या योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे जिल्हा प्रशासनाला 3 कोटीचे बक्षीस मिळाले होते. मात्र, बक्षीस रकमेचा वापर शेतकऱ्यांसाठीच करण्याचा निर्णय पालकमंत्री शंकरराव गडाख व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला होता. त्याचा आता खरीप हंगामात फायदा होणार आहे.
खरिपातील या पिकांना होणार फायदा
सध्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने तयारी सुरु झाली आहे. हंगामपूर्व शेती मशागतीची कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे बीबीएफ या यंत्राचा वापर या हंगामात शेतकऱ्यांना करता येणार आहे. यामुळे सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस आणि मका या पिकांचा रुंद वरंबा आणि सरी यंत्राद्वारे पेरणी करता येणार आहे. यामुळे एकरी कमी प्रमाणात बियाणे तर लागते शिवाय उत्पादनातही वाढ होते. त्यामुळे बीबीएफ यंत्राद्वारेच खरिपातील पेरणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
बक्षीस रकमेच्या माध्यमातून शेतीकामे
शेती व्यवसायात काळानुरुप बदल केला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. त्याअनुशंगाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बीबीएफ म्हणजेच एकूण 508 रुंद वरंबा आणि सरी यंत्राचा वापर करणे, बियाणे प्रतवारीसाठी 1587 स्पायरल सेपरेटर आणि 1500 स्थानिक बियाणे कीटचे वाटप करणे ही प्रणाली डीबीटीद्वारे राबवली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Latur Market : शेतीमालाचे दर स्थिरावले, आता खरेदी केंद्रावर अधिकची आवक, कारण काय?
Cotton Rate : संपूर्ण हंगामात कापसाला वाढीव दराची झळाळी, अंतिम टप्प्यात विक्रमी दर