माळरानावर अडीचशे फळझाडांचे संवर्धन, ओलांडेश्र्वर वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम
काही मित्रांनी मिळून माळरानावर अडीचशे फळझाडांचे संवर्धन केले होते. ओलांडेश्र्वर वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम अनेकांच्या फायदाचा ठरतोय, त्याचबरोबर ज्यांनी हा उपक्रम राबविला त्यांचं सर्वत्र कौतुक सुध्दा होत आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : पावसाळा (Rain Season Update) लागला की सोशल मीडियावर वृक्ष लावा, असा संदेश दरवर्षी देण्यात येतो. वृक्ष लागवडीचे फायदे व तत्वज्ञान सांगणारे व्हाट्सअप गुरु अनेक पाहायला मिळतात. मात्र, या पलीकडे प्रत्यक्ष कृतीतून वृक्ष सवर्धन करून दाखवणारा डोणगाव (buldhana dongaon) येथील ओलांडेश्वर वृक्ष सवर्धन समितीने अडीचशे झाडे लावली. एव्हढेच नव्हे तर त्या झाडाचे स्वखर्चातून सवर्धन सुद्धा केले आहे. लावलेली सर्व झाडे जगवण्याची किमया या समितीने करून दाखवली आहे. त्या ग्रुपने उन्हाळ्यात खडकाळ भागात झाडे (tree cultivation) लावून त्यांना वेळच्यावेळी पाणी घालून जागवलं आहे. त्यामुळे त्या भागातली लोकं त्यांचं कौतुक करीत आहेत.
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील विक्रांत तुपाडे आणि त्यांचे समविचारी मित्र यांनी वृक्ष सवर्धन करण्याची योजना बनवली. लगेच ओलांडेश्वर वृक्ष सवर्धन समिती बनवून डोणगाव ते आरेगाव रोडवर दररोज सकाळी शेकडो लोक फिरायला जातात. याठिकाणी संपूर्ण माळरान आहे. फिरणाऱ्या वयोवृद्ध लोकांना आरोग्यवर्धक वातावरण सह त्याबरोबर पक्ष्यांना आणि गरिबांना फळ मिळावे, या उद्देशाने दररोज दोन फळ झाडे लावलीय. ज्यामध्ये आंबा, जांभूळ, नारळ अशी फळ झाडे लावण्यात आली आहेत. हा उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून राबविला असून त्यातून 250 पेक्षा झाडे लावण्यात आली आहेत. एव्हढेच काय तर त्या झाडांना दररोज पाणी टाकून आणि त्या झाडांना ट्री गार्ड लावून त्यांचे संवर्धन ही केले आहे. समितीने ज्या ठिकाणी ही झाडे लावली, त्याठिकाणी अगदी खडकाळ जमीन असून त्याला न जुमानता प्रत्येक झाडाला दररोज पाणी टाकून त्याची योग्य निगा राखली. ओलांडेश्वर वृक्ष सवर्धन समितीने प्रयत्नाने काहीही होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले.
पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे चा गजर
बुलढाणा जिल्ह्यात पावसाळा लांबल्याने पारंपारिक पद्धतीने नागपंथी समाजाने वरूण राजाकडे साकडे घातले आहे. धोंडी धोंडी पाणी दे, म्हणत वरूण राजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न नागपंथी समाजाकडून केला जात आहे. पारंपारिक पद्धतीचा वापर करून अंगाला निंबाच्या फांद्या आणि बांबूला बेडूक बांधून वरूण राजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष हे आकाशाकडे लागले आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस काही पडायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. त्यासाठीच पारंपारिक पद्धतीने पाऊस लवकर यावा म्हणून धोंडी धोंडी पाणी दे चा गजर गावोगावी पाहायला मिळतं आहे.