Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?

खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडत आहेत तर पिकांची वाढही खुंटत आहे. पिकांची उगवण होताच मुसळधार पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने पाणी साचून राहिलेले आहे. निचरा होणाऱ्या जमिनीतील पिके ही सुस्थितीमध्ये आहेत. मात्र, अशाच प्रकारे पावसामध्ये सातत्य राहिले तर पिकांचे नुकसान अटळ आहे.

Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?
मराठवाड्यात पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 4:20 PM

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा (Monsoon) मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी देर आऐ..दुरुस्त आऐ..अशीच स्थिती आहे. कारण गेल्या 10 दिवसांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणची पिके पाण्यात आहेत तर (Dam Water Level) धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जून महिन्याची कसर गेल्या 10 दिवसांमध्ये भरुन निघाली आहे. अतिरिक्त पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन हे पाण्यात आहे तर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी आता करीत आहेत. सध्याची ही स्थिती असली 21 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्या राहणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 ते 21 जुलै दरम्यानच्या काळात या आठही जिल्ह्यामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिकचा पाऊस होणार आहे. त्यामुळे पावसाचा धोका टळला असे नाही. मराठावड्यातील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने पाण्याची आवक ही वाढली आहे. मात्र, कोकण विदर्भ आणि उत्तर महाराष्टापेक्षा मराठवाड्यात स्थिती ही नियंत्रणात आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यातूनच पावसाला सुरवात झाली होती. 9 जुलैपर्यंत एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 198 मिमी पावसाची नोंद झाली होती. हिंगोली जिल्ह्यात 123 मिमी तर परभणी जिल्ह्यामध्ये 155 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. आगामी आठवड्यातही या जिल्ह्यांमध्येच वरुण राजाची कृपादृष्टी राहणार आहे. त्यामुळे आगामी 7 दिवसांमध्ये पिके तरली जाणार की नुकसान होणार हे पहावे लागणार आहे.

खरीप पिकांची वाढ खुंटली

खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडत आहेत तर पिकांची वाढही खुंटत आहे. पिकांची उगवण होताच मुसळधार पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने पाणी साचून राहिलेले आहे. निचरा होणाऱ्या जमिनीतील पिके ही सुस्थितीमध्ये आहेत. मात्र, अशाच प्रकारे पावसामध्ये सातत्य राहिले तर पिकांचे नुकसान अटळ आहे.

हे सुद्धा वाचा

शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव

खरिपातील पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत. लहान शंखीसाठी मिठाची किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुध्दा वापर करता येणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.