Rain : दुष्काळात तेरावा, अधिकचा दर असलेला भाजीपालाही ‘पाण्यात’
आंबेगाव तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे .गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल आणि पावसाच्या सरी हे ठरलेले आहे. त्यामुळे शेती शिवारात पाणी साचले असून अनेक ठिकाणा बांधही फुटले आहेत. हंगामाच्या सुरवाातीलाच पावसाने दमदार एंन्ट्री केली असली हाच पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे.
आंबेगाव : राज्यात पावसाचे आगमन झाले असले तरी आता त्याने आपला लहरीपणा दाखविण्यास सुरवात केली आहे. (Maharashtra) राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाने सातत्य ठेवले आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात मात्र, पाठ फिरवलेलेच आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात तर गेल्या तीन दिवसांपासून (Heavy Rain) पावसामध्ये सातत्य आहे. शेतामधील बांध फुटले असून शेतजमिन खरडून गेली आहे. मंचरच्या रविवारच्या आठवडी बाजार दिवशी अचानक पावसाने हजेरी लावल्याने (Vegetable) भाजीपाल्याचे नुकसान तर झालेच पण विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली होती. सध्या शेतीमालापेक्षा भाजीपाल्यालाच अधिकचा दर असून आता अधिकच्या पावसाने नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा अशीच काहीशी स्थिती झाली आहे.
सततच्या पावसाने नुकसान
आंबेगाव तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे .गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल आणि पावसाच्या सरी हे ठरलेले आहे. त्यामुळे शेती शिवारात पाणी साचले असून अनेक ठिकाणा बांधही फुटले आहेत. हंगामाच्या सुरवाातीलाच पावसाने दमदार एंन्ट्री केली असली हाच पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे. मंचर येथे आज आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसाने बाजारात आलेल्या नागरिकांसह आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली यामधे शेतकऱ्याने विक्री साठी आणलेल्या पालेभाज्या यांचे मात्र नुकसान झाले.
आता पेरणीचा मार्ग मोकळा
पुणे जिल्ह्यातील काही भागात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय कृषी विभागाने 75 ते 100 मिमी पावासाची नोंद झाल्यावर पेरणीचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यात पाऊस झाला असून आता वाफसा झाला की पेरणी करणार आहे. राज्यात पावासाचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी अवकृपा तर पुणे जिल्ह्यात कृपादृष्टी असेच चित्र आहे.
भाजीपाल्याचे नुकसान
सध्या शेतीमालाच्या दरात घसरण झाली असली तरी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. पावसाला सुरवात होताच ही दरवाढ ठरलेली आहे. मात्र, पावसाने केवळ आठवडी बाजारात दाखल झालेल्या भाजीपाल्याचेच नुकसान असे नाही तर शेतामध्येही अधिकचे पाणी साचल्याने नुकसान हे ठरलेलेच आहे. त्यामुळे आगमनाने शेतकरी सुखावला असला तरी सततच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे.