बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

बोंडअळीचे संकट काहीसे कमी झाल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या पिकाकडे आकृष्ठ झाल्याचे दिसतंय. यंदा सोयाबीनच्या पाठोपाठ कापसाची लागवड होण्याची शक्यता दिसतेय. (Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा
बोंडअळीचे संकट काहीसे कमी झाल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या पीकाकडे आकृष्ठ झाल्याचे दिसतंय.
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:04 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत सर्वदूर पावसाचे आगमन झाले नाही, मात्र बळीराजाची आतापासूनच लगबग सुरू झालीय. नांदेड जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असणार आहे तर त्या खालोखाल कापूस लागवडीकडे देखील शेतकरी वळलेला दिसतोय. शेत शिवारात कपाशीच्या लागवडीची धांदल दिसून येत आहे. (Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

मराठवाड्यातील बहुतांश भागात पूर्वी कापसाचे पीक मोठया प्रमाणात घेतलं जात असायचं. मात्र गेल्या काही वर्षात खरीप हंगामात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र मोठया प्रमाणात वाढलंय. तीन वर्षांपूर्वी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे या पांढऱ्या सोन्याकडे शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून पाठ फिरवली होती. मात्र बोंड अळी नियंत्रणात आल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या लागवडीकडे वळलाय. शेतकऱ्याला आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

कापसाची धूळ पेरणी

गतवर्षी परतीच्या पावसामुळे नांदेडसह बहुतांश भागात भूजल पातळी टिकून आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करून घेतलीय. आता या कापसाच्या पिकांचे अंकुर वाऱ्यावर डलताना दिसतायत. जमिनीत आलटून पालटून पिके घेतल्याने उत्पादनात वाढ होते, हा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यातून यंदा कापसाचे पीक चांगले येईल अशी आशा आहे.

पेरणीसाठी घाई नको : कृषी विभाग

नांदेडसह मराठवाड्यात मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलंय. साधारणतः जमिनीत चांगली ओल झाल्यावरच खरीप हंगामातील पेरण्या कराव्यात असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. मात्र सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसतंय.

सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाई

खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होते. मात्र शेतकऱ्यांच्या पसंतीची असलेले महामंडळाच्या महाबीजची टंचाई जाणवतेय. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्यास सुरुवात केलीय.

इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना

शेतीतील बहुतांश कामे आता यंत्राद्वारे करण्यात येतायत. सर्जा राजाच्या जोडीवर शेती आता दुर्मिळ झालीय. त्यामुळे ट्रॅक्टर आणी इतर यंत्राच्या मदतीने शेतीची कामे करावी लागतायत. त्यातच डिझेल जवळपास शंभराच्या जवळ गेलंय. त्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्याने बळीराजा हवालदिल झालाय.

(Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

हे ही वाचा :

एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

20 रुपयांनी मका पिकाची MSP वाढवून उत्पन्न दुप्पट कसं करणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.