बाजारात फक्त कोथिंबीरीचीच चलती, “हे” आहे कारण

राज्यातील बहुतांश शहरात पालेभाज्या पुरवण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असते. ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला हा नाशिकमधून निर्यात होत असतो.

बाजारात फक्त कोथिंबीरीचीच चलती, हे आहे कारण
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 5:03 PM

नाशिक : सध्या बाजारात कोथिंबीरीला (Coriander) मोठी मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे बाजार समितीत (APMC) येणाऱ्या कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांकडून आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबीरचे भाव गडगडले आहे. नाशिकच्या (Nashik) बाजार समितीत शुक्रवारी कोथिंबीरीची जुडी 191 रुपयांना विक्री झाल्याची नोंद झाली आहे. नाशिक बाजार समितीत शुक्रवारी 657 क्विंटल कोथिंबीरीची आवक झाली होती. त्यात गावठी कोथिंबीरीला जास्तीची मागणी आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात संततधार सुरूच असल्याने पालेभाज्या शेतातच सडल्याचे चित्र होते. त्यामुळे पालेभाज्या तेजीत असणार याचा अंदाज व्यापऱ्यांसह शेतकऱ्यांना होताच. पण कोथिंबीरच्या भावात झालेली उच्चांकी दर बाजारसमितीत मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्यातील बहुतांश शहरात पालेभाज्या पुरवण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची असते. ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला हा नाशिकमधून निर्यात होत असतो.

नाशिकमधील भाजीपाला हा जास्त दिवस टिकण्यासाठी, दुसऱ्या शहरात नेण्यासाठी असलेली वाहतुकीची सुलभता यामुळे व्यापारी वर्ग नाशिकला प्राधान्य देत असतो.

याच कारणामुळे नाशिकचे शेतकरी नाशिकच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत असतात.

सध्या मात्र थेट व्यापारीच बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यावर भर देत असले तरी बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने व्यापारी देखील हतबल झाले आहे.

पितृपक्षात देखील पालेभाज्या महागल्या होत्या त्यावेळी देखील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे प्रमुख कारण होते, परंतु महिना उलटून गेला तरी परिस्थिती कायम आहे.

कोथिंबीरीची सध्याची परिस्थिति पाहता बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी बाजार समितीत येत असल्याने कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळत आहे.

मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होत असला तरी किरकोळ बाजारातील ग्राहकांना आणखी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.