Cotton Rate : उत्पादन घटल्यानेच कापसाला विक्रमी दर, हंगामात अतिवृष्टीचा अडसर कायम राहिला

यंदा माजलगाव तालुक्यात 20 हजार हेक्टरावरच कापशीती लागवड करण्यात आली होती. घटत्या उत्पादनाबरोबरच अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा अधिकचा दर असताना कापूसच नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी नफा-तोटा याचा विचार न करता घेतलेले उत्पादन आज फायद्याचे ठरत आहे.

Cotton Rate : उत्पादन घटल्यानेच कापसाला विक्रमी दर, हंगामात अतिवृष्टीचा अडसर कायम राहिला
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 12:44 PM

बीड : कापूस उत्पादनात मराठवाड्यात बीड जिल्हा हा आघाडीवर होता. (Kharif season,) कोरडवाहू शेत जमिनीवर अधिक प्रमाणात  (Cotton Crop) कापसाचेच पीक घेतले जात होते. मात्र, दरावरुन होत असलेली निराशा आणि उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला. काळाच्या ओघात कापसाची जागा ही सोयाबीने घेतली आहे. यंदा माजलगाव तालुक्यात 20 हजार हेक्टरावरच कापशीची लागवड करण्यात आली होती. घटत्या उत्पादनाबरोबरच  (HeavyRain)अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा अधिकचा दर असताना कापूसच नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी नफा-तोटा याचा विचार न करता घेतलेले उत्पादन आज फायद्याचे ठरत आहे.

कापसाला विक्रमी दर, आवकही वाढली

माजलगाव येथील खरेदी केंद्रावर कापसाला 9 हजार 500 रुपये प्रती क्विंटलचा दर मिळत आहे. मध्यंतरी कोरोनाचे संकट यामुळे मागणीत घट झाली होती. त्यामुळे कापसाचे दर हे 7 हजारावरच येऊन ठेपले होते. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनीही विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे मागणीत वाढ झाली परिणामी कापसाला 9 हजार 500 रुपये दर मिळाला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच काही अपवाद वगळता कापसाला चांगला दर राहिलेला आहे. त्याचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात होत आहे.

कशामुळे घटत आहे कापसाचे क्षेत्र?

बीड जिल्ह्यामध्ये कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जात होते. सोयाबीनपेक्षा शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीवरच होता. हंगाम सुरु झाला की वेचणीप्रमाणे भांडवल खेळते राहत होते. पण मध्यंतरी दुष्काळजन्य परस्थिती आणि घटलेले दर यामुळे शेतकरी कापसापेक्षा सोयाबीनवरच अधिक भर देत होता. शिवाय फरदड कापसामुळे शेतजमिन आणि इतर पिकांचेही नुकसान होत असल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी थेट पीकपध्दतीमध्येच बदल केला आहे. आता सर्वाधिक उत्पादन माजलगाव तालुक्यातच घेतले जात आहे.

अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट

हंगामाच्या सुरवातीला नाही पण ऐन मध्यावर वेचणी सुरु असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे बोंडगळ तर झालीच पण ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादनात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे अधिकचा दर मिळत असला तरी दुसरीकडे घटलेले उत्पादन हा देखील मुद्दा महत्वाचा आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे..!

अखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला

Sangli Market : राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.