Cotton : …म्हणूनच कापसाचे दर वाढले, कृषी विभागाच्या पीक कापणीच्या प्रयोगात काय समोर आले?
खरीप हंगामातील कापूस असे एक पीक होते ज्याचे हंगामाच्या सुरवातीपासूनच याचे दर वाढत आहेत. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात हे दर अणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व कशामुळे होत होते याचे वास्तव कृषी विभागानेच समोर आणून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे लातूर विभागातील पीक कापणी प्रयोग पार पडला असून यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे.
लातूर : (Kharif Season) खरीप हंगामातील कापूस असे एक पीक होते ज्याचे हंगामाच्या सुरवातीपासूनच याचे दर वाढत आहेत. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात हे दर अणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व कशामुळे होत होते याचे वास्तव (Agricultural Department) कृषी विभागानेच समोर आणून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे लातूर विभागातील पीक कापणी प्रयोग पार पडला असून यंदा (Cotton Production) कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम हा कापूस पीकावरच झाला आहे तर प्रतिकूल परस्थितीमध्येही सोयाबीन उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच वर्षातील उत्पादकतेक्षा यंदा कापूस वगळता इतर पिकांच्या उत्पादकतेमध्ये किंचित वाढ झाली आहे.
कपाशीच्या उत्पादकतेमध्ये एक क्विंटलची तफावत
कपाशीची पाच वर्षाची उत्पादकता ही हेक्टरी 3 क्विंटल 60 कोलो एवढी होती. मात्र, वातावरणातील बदल आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात तब्बल 2 क्विंटलची घट झाली आहे. प्रत्यक्षात 2 क्विंटल 60 कोलो एवढेच उत्पादन झाले आहे. घटत्या उत्पादनाबरोबरच कापसाचे क्षेत्रही कमी झाले आहे. कापसासाठी प्रतिकूल परस्थिती आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसामुळेच हा परिणाम झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
आगामी हंगामात कापसाच्या क्षेत्रात होणार वाढ
यंदा कापसाचे उत्पादन घटले असले तरी प्रत्यक्षात विक्रमी दर कापसाला मिळत आहे. कापसामुळे क्षेत्र पडीक राहते शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवरही होत असल्याने क्षेत्रात मोठी घट झाली होती. पण संपूर्ण हंगामात कापसाचे दर हे चढेच राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी हंगामात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे विक्रमी दरामुळे आगामी हंगामात चित्र वेगळे असणार आहे. मात्र, खरिपातील सोयाबीन, मूग, तूर, उडीद या पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे.
पीक कापणीचा फायदा काय?
पीक विमा कंपनीकडून गेल्या पाच वर्षातील उत्पादकता ही तपासली जाते. गेल्या पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन कमी असेल तरच नुकसानभरपाई दिली जाते. अन्यथा नुकसान झाले असे ग्राह्यच धरले जात नाही. त्यामुळे आता कृषी सहसंचालक कार्यालयाकडे हे अहवाल तर जमा झाले आहेत. उर्वरीत दोन जिल्ह्याचे अहवाल जमा झाले की कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या :
देगावच्या शिवारात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, तरुण शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला
Photo Gallery : हंगामाची सुरवात अन् शेवट सर्वकाही पाण्यातच, द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका
PM Kisan Yojna : 25 मार्चला ठरणार’त्या’शेतकऱ्यांच्या योजनेचे भवितव्य, 31 मार्चला चित्र स्पष्ट