pradhan mantri fasal bima yojana maharashtra : पीक विमा काढण्याची आज शेतकऱ्यांना शेवटची संधी, मागील वर्षीच्या तुलनेत…
agriculture insurance company claim status pmfby : आज 1 रुपयात आपल्या शेतातील पिकांचा विमा काढण्याची शेतकऱ्यांना शेवटची संधी आहे. यानंतर ऑनलाईन पीक विमा काढण्याची पद्धत पुर्णपणे बंद झाली आहे.
महाराष्ट्र : जून महिना कोरडा गेल्यानंतर अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पिकांचं मोठं (crop insurance maharashtra) नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पीक अद्याप पाण्याखाली असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे नदी काठची शेती पुर्णपणे खराब झाली असल्याची माहिती स्थानिकांनी सांगितली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत (pradhan mantri fasal bima yojana maharashtra) 2 ऑगस्टपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. आज पीक विमा काढण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे पीक विमा काढण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी (agriculture insurance company claim status pmfby) ही संधी न गमविता 1 रुपयात पीक विमा काढून पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. पुढच्या दोन महिन्यात भारतात पर्जन्यवृष्टी कमी होईल असं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.
नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा काढला जातो. याच्या आगोदर शेतीसाठी जो विमा काढला जात होता. त्यासाठी शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम भरली जात होती. पण यावर्षी केंद्र सरकारकडून एक रुपयात पीक विमा काढण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची शेवटची तारिख जुलै अखेरपर्यंत होती.
अनेक शेतकरी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्यापासून वंचित होते. त्यांना पुढचे दोन दिवस वाढवून देण्यात आले आहेत. पीक विम्याची ऑनलाईन प्रक्रिया फक्त आजच्या दिवशी सुरु राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे आहे.
ज्या शेतकऱ्यांना फॉर्म भरताना अडचणी येणार आहेत. त्यांनी टोल फ्री क्रमांक 18002005142, 18002004030 या दोन क्रमांकावर संपर्क साधावा. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी जिल्ह्यातील धान पीक अधिसूचित केलेले आहे. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.