Paddy Crop : धरणाच्या पाण्यावर साधला पेरा आता पावसावर बहरणार का धान पीक, पेरणी झाली चिंता कायम?

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भात पिक हे इगतपुरी तालुक्यात घेतले जाते. पावसाने उघडीप दिली तरी शेतकऱ्यांनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन भात पेरणीची कामे उरकून घेतली. शिवाय या पाण्याच्या आधारावर उगवणही झाली. आता गेल्या चार दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने रोपांची लागवडही सुरु झाले आहे.

Paddy Crop : धरणाच्या पाण्यावर साधला पेरा आता पावसावर बहरणार का धान पीक, पेरणी झाली चिंता कायम?
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला वेग आला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 9:59 AM

इगतपुरी : पेरणीचे मुहूर्त साधले तरच (Production Increase) उत्पादनात भर पडणार याबाबत शेतकरीही कमालीचा जागरुक झाला आहे. त्यामुळेच यंदा पावसाने ओढ दिली तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भावलीधरणाच्या पाण्यावर (Paddy Crop) भात पेरणी करण्यात आली आहे. उपलब्ध पाण्यावर  (Kharif Crop) खरिपातील पेरणी तर शेतकऱ्यांनी उरकती घेतली आहे पण पिक वाढीसाठी पावसाची गरज भासणार आहे. चारसुत्री कार्यक्रम राबवून या भागातील मानवेढे, बोर्ली, भावली परिसरात पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पेरा तर उरकता घेतला आहे. शिवाय आता पावसाचीही कृपादृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचा उद्देश साध्य होणार का हे पहावे लागणार आहे.

पेरा झाला, रोपे उगवली आता लागवडीची लगबग

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भात पिक हे इगतपुरी तालुक्यात घेतले जाते. पावसाने उघडीप दिली तरी शेतकऱ्यांनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन भात पेरणीची कामे उरकून घेतली. शिवाय या पाण्याच्या आधारावर उगवणही झाली. आता गेल्या चार दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने रोपांची लागवडही सुरु झाले आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्याने भात लागवडीपर्यंत तरी सर्वकाही साधले आहे. पण अनेक भागात पावसाचा लहरीपणा सुरु असल्याने शेतकरी ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे. भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे.

कोलम, इंद्रायणीला पसंती

इगतपुरी तालुक्यात, 1008 कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातासह संकरित विकसित भाताच्या वाणालाही तालुक्यात उत्तम प्रतिसाद आहे. तालुक्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी 1008, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. याकरिता चारसुत्री,पट्टा पद्धत,एस आर टी, व इतर पद्धतीचा वापर केला जातो. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकरी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

चारसुत्री पध्दतीने उत्पादनात होणार वाढ

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.