शेतकऱ्यांचे चेहरे फुलले! जिरे आणि बडीशेपची सोन्याच्या दराने विक्री
सध्या जिऱ्याला अधिक भाव मिळत असल्यामुळे क्लिंटलला ६४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. जिरा इसबगोल आणि बडीशेप याला सु्ध्दा चांगला भाव मिळत आहे.
मुंबई : शेतीच्या मालाला चांगला भाव मिळावा असं प्रत्येकाला वाटतं असतं. त्यामुळे शेतकरी शेतात अधिक राबत असतो. काही लोकांनी पारंपारिक शेती करणं बंद केलं आहे. मसाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो. काही राज्यांनी मसाला शेती (Cumin cultivation) आणि फळ शेतीसाठी अनुदान (subsidy) जाहीर केलं आहे. सध्या जीऱ्याला सोन्याचा भाव मिळत आहे. राजस्थान (rajsthan) राज्यात नागौरमध्ये जीऱ्याचा दर 64 हजार रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या जिऱ्याची मागणी पाहता, 70 हजार रुपये प्रति क्विंटल दर झाला तर आच्छर्य वाटणार नाही असं अनेकांनी व्यापारी म्हणतं आहेत.
या पिकांना सुध्दा मिळतोय चांगला भाव
जिरे या पिकाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूष आहेत. मोठ्या प्रमाणावर ते त्यांच्या उत्पादनासह बाजारपेठेत पोहोचत आहेत. जिरे या पिकासोबत इसबगोल या पिकाला 27 हजार 100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. बडीशेप 28 हजार प्रति क्विंटल विकलं जाणार आहे. जिरा इसबगोल आणि बडीशेपची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. देशात नागौरची मंडी मूंग आणि जिर अधिक प्रसिद्ध आहे.
का वाढली किंमत ?
जीरा व्यापारी अखिलेश गढ़वार यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिऱ्याची मागणी अधिक आहे. हवामान बदलामुळे जिऱ्याचं अधिक नुकसान झालं आहे. बाजारातील मागणीनुसार जिरं पोहोचतं नाही. त्यामुळे जिऱ्याची किंमत वाढत आहे.
दोन महिन्यात 50 से 60 हजार रुपयांचा भाव
एप्रिल महिन्यापासून जिऱ्याला अधिक पैसे मिळत आहेतय. १२ एप्रिलला जीरे या पीकाचा दर ५० हजार ओलांडला होता. फक्त दोन महिन्याच्या अंतराने आता तो दर ६० हजारच्या आसपास गेला आहे. जीऱ्याचा दर असाचं वाढत राहिला तर, हा दर 70 हजार रुपये पर्यंत पोहचू शकतो.