‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना काय?

कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात ‘नर्सरी हब’ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी (Agree University) यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, असे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले.

‘नर्सरी हब’ सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना काय?
नर्सरीसाठी नवा प्लॅन बनवा
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 8:59 PM

मुंबई : राज्यात एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच रोपे, कलमे विक्री सुविधा केंद्र (नर्सरी हब) (Nursery Hub) असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिकाधारकांसाठी त्यांच्याकडील फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती यांची कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात ‘नर्सरी हब’ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी (Agree University) यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, असे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. मंत्रालयात राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, कृषी आयुक्त धीरज कुमार, रोपवाटिका उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विभागानुसार पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी प्रायोगिक तत्वावर नर्सरी हब सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशी सूचना देऊन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश भुसे यांनी दिले.

परकीय चलवाढीस मदत होईल

कृषीमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. फलोत्पादन पिकांच्या विविध वाणांची कलमे-रोपे एका ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन निवड करता येईल. तसेच विशिष्ट वाणाच्या खरेदी-विक्रीतील किंमतीचा फरक कमी होऊन अवास्तव नफेखोरीला आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे लघुउद्योगास चालना, रोजगार निर्मितीमध्ये वाढ, शोभीवंत फुले-फळे निर्यात वाढून देशाच्या परकीय चलनवाढीस मदत होईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.

पुणे कृषी भवनाच्या कामाला गती द्यावी

शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना कृषि सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कृषि विभागाचे कामकाज एका छताखाली आणण्यासाठी पुणे येथे कृषि भवन उभारण्यात येत आहे. कृषी भवनाच्या कामाला गती देवून हा प्रकल्प वेळेत पुर्ण करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्रालयात कृषि मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कृषी भवनाच्या बांधकाम आराखडासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या कृषि योजनांची सेवा आणि माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि प्रशासकीय कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी आणल्यास कामाला गती प्राप्त होईल. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कृषि भवनाचे काम कालमार्यादेत पूर्ण करावे, असेही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

द्राक्षांच्या घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट; आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

वीजबिलमाफीवरून शेतकरी आक्रमक, सोलापुरातल्या शेतकऱ्यांचा सरकारला काय इशारा?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.