Dairy Farming : घमाघम दूध देतात या म्हशी, जास्त थकण्यापेक्षा या जातीच्या म्हशी पाळा, दुधाचं उत्पन्न वाढवा
देशातही अशा काही म्हशींच्या जाती आहेत, ज्यांची हजार लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. त्याचमुळे आम्ही आता तुम्हाला अशाच प्रकारच्या म्हशींच्या जातीची माहिती देणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत बंपर नफा मिळू शकणार आहे.
नवी दिल्लीः देशाच्या ग्रामीण भागात पशुपालन करणे हे आता उत्पन्नाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. गावागावात गाई-म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. तर देशातही अशा काही म्हशींच्या जाती आहेत, ज्यांची हजार लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. त्याचमुळे आम्ही आता तुम्हाला अशाच प्रकारच्या म्हशींच्या जातीची माहिती देणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत बंपर नफा मिळू शकणार आहे.
मुर्राह म्हैस
जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशींमध्ये मुर्राह जात सर्वोत्तम मानली जाते. उत्तर भारतातील प्रदेशात त्यांचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते. ही म्हैस एका महिन्यात 1000 लिटरहून अधिक दूध देत असल्याचा दावा केला जात आहे.
मुर्राह म्हशींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या आहाराचीही विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या म्हशीचे पालन उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
सुरती म्हैस
पशुपालकांच्या सर्वात आवडत्या म्हशींमध्ये सुर्ती जातीचाही समावेश होतो. दुग्ध व्यवसायातून चांगला नफा मिळवायचा असेल तर या जातीच्या म्हशींचे पालनपोषण करता येत असल्याचे शेतकरी सांगतात.
या म्हशीची एका महिन्यात 600 ते 1000 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. त्यांचे दूध आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण 8 ते 12 टक्के असते अशीही माहिती दिली जाते.
मेहसाणा म्हैस
मेहसाणा म्हशीची ही जात गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात आणि गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील काही भागात आढळते. ही म्हैस एका महिन्यात 600-700 लिटर पर्यंत दूध देते.
ही म्हैस एका दिवसात 20 ते 30 लिटर दूध देते. ही म्हैस गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाळत असल्याचे दिसून येते. या अशा प्रकारच्या म्हशींमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचेही सांगितले जात आहे.