Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका

हंगाम कोणताही असो त्यावर वातावरणाचा परिणाम हा ठरलेला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन करुनही वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांचे प्रयत्न तर व्यर्थ ठरत आहेतच पण आर्थिक नुकसानही होऊ लागले आहे. मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेने कमालीचा पारा गाठला आहे. यामुळे पिकांनी तर माना टाकल्या आहेतच पण चिंतेची बाब ही आहे की मुबलक पावसामुळे तुडुंब भरलेले जलस्त्रोतांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे ठिबंक सिंचनाचा आधार घेऊनही पिकांना देणे मुश्किल होत आहे.

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:15 AM

औरंगाबाद : हंगाम कोणताही असो त्यावर वातावरणाचा परिणाम हा ठरलेला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन करुनही (Change Climate) वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांचे प्रयत्न तर व्यर्थ ठरत आहेतच पण आर्थिक नुकसानही होऊ लागले आहे. (Marathwada) मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेने कमालीचा पारा गाठला आहे. यामुळे (Crop Damage) पिकांनी तर माना टाकल्या आहेतच पण चिंतेची बाब ही आहे की मुबलक पावसामुळे तुडुंब भरलेले जलस्त्रोतांनी आता तळ गाठला आहे. त्यामुळे ठिबंक सिंचनाचा आधार घेऊनही पिकांना देणे मुश्किल होत आहे. उन्हाळी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असतानाच ही परस्थिती ओढावल्याने उत्पादन घट होणार आहे. त्यामुळे खरीप काय अन् रब्बी हंगाम काय शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

उन्हाळी हंगामातील या पिकांना फटका

शेतकऱ्यांनी मुबलक पाण्याच्या जीवावर यंदा पीक पध्दतीमध्ये बदल केला. शिवाय उत्पादनवाढीसाठी कृषी विभागानेही यासंदर्भात जनजागृती केली होती. त्यामुळेच यंदा प्रथमच उन्हाळी सोयाबीन, मका या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती. सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने त्याला सातत्याने पाणीपुरवठा होणे गरजेच आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिकांची जोपासणा केली पण अंतिम टप्प्यात वाढते ऊन यामुळे पीके ही माना टाकत आहेत. त्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. मराठवाड्यात सोयाबीन, मका, उन्हाळी कांदा याचा प्रयोग शेतकऱ्यांनी प्रथमच केला होता. मात्र, आता पदरी काय पडणार हे पहावे लागणार आहे.

कांदा पोसण्यापूर्वीच काढण्याची नामुष्की

यंदा सोयाबीन पाठोपाठ उन्हाळी कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कांदा दरात चढ-उतार होत असले तरी शेतकरी या हंगामी पिकाचा प्रयोग करतोच. पण उन्हाळी कांदा बाजारपेठेत जाण्यापूर्वीच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे कांदा पात 10 ते 15 दिवस अगोदरच वाळली आहे. शिवाय याचा कांदा पोसण्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. अशा अवस्थेत पाण्याचे नियोजन महत्वाचे असताना शेतकरी विजेचा लपंडाव आणि घटलेला पाणीसाठा यामुळे हतबल झाला आहे.

काय आहे शेतकऱ्यांसमोर पर्याय?

सध्या गहू, हरभरा, ज्वारी या मुख्य पिकांची काढणी झालेली आहे. शेत शिवारात सोयाबीन, कांदा आणि मक्यासारखी मोजकी पिके उभा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. शिवाय स्प्रिंक्लर, ठिबकच्या वापरावर भर देऊन पिकांना दिवसा पाणी न देता रात्रपाळीने पाणी देणे महत्वाचे आहे. यामुळे पाण्याचा योग्य वापर होणार आहे. उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन आहे. पावसाळी पीक असल्याने अधिकचे पाणी लागते. आता अंतिम टप्प्यातच जर नियोजन कोलमडले तर याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : मुख्य पिकांचे उत्पादन घटलं, महिला शेतकऱ्याने हंगामी कलिंगड विक्रमी उत्पन्न मिळवलं!

Gondia : नवेगावबांध गावात शेती व्यवसायच धोक्यात, पडिक क्षेत्र ठेवण्यावरच शेतकऱ्यांचा का आहे कल?

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.