Akola : शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा, शॉर्ट सर्किटमुळे हातातोंडाशी आलेला गहू आगीच्या भक्ष्यस्थानी
पिकांचा पेरा केल्यापासून उत्पादनवाढीची स्वप्न बघायची आणि कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी शॉर्ट सर्किटसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण चार महिन्याची मेहनत आणि पैसा दोन्हीही वायाच. असाच प्रकार अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीत वसलेले अंबाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतामध्ये झाला आहे.
अकोला : पिकांचा पेरा केल्यापासून उत्पादनवाढीची स्वप्न बघायची आणि कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी (Short Circuit) शॉर्ट सर्किटसारख्या घटनांमुळे (Farmer) शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण चार महिन्याची मेहनत आणि पैसा दोन्हीही वायाच. असाच प्रकार अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या कुशीत वसलेले अंबाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतामध्ये झाला आहे. गव्हाची सोगणी सुरु असतानाच विद्युत वाहिन्याच्या शॉर्ट सर्किटमुळे अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते झाले होते. यामध्ये 150 क्विंटल (Wheat) गहू तर जळून खाक झालाच पण 550 संत्रा झाडेही उध्वस्त झाली आहे. तळहात्याच्या फोडाप्रमाणे साभांळ केलेल्या पिके वाचविताना शेतकरी श्रीराम वडतकर हे देखील यामध्ये जखमी झाले होते. मात्र, त्यांचे केविलवाणे प्रयत्नही निष्फळ ठरले.
शॉर्ट सर्किटमुळे अग्नीचे तांडव
जीर्ण झालेल्या विद्युत तारा आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे यंदा शॉर्टसर्किच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र,शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालचे आहे पण वर्षभराची मेहनतही वाया जात आहे. श्रीराम वडतकर यांच्या शेतातील गव्हाची काढणी सुरु होती तर गव्हाला लागूनच संत्रा बाग बहरली होती. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये विक्रमी उत्पादन होईल असा त्यांना आशावाद होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे 100 ते 150 क्विंटल चा गहू त्याचबरोबर असलेली हिरवी गार संत्राची 550 झाडे संपूर्णता जळून खाक झाली,व त्याचबरोबर शेतामधील स्पिंकलर पाईप शेतामध्ये असलेली केबल व शेती उपयुक्त असलेले शेतामधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
धगधगत्या उन्हामुळे आगीचे लोट
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही अकोला जिल्ह्यात होत आहे. अशातच आता रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे सुरु आहेत. प्रतिकूल परस्थितीमध्ये वडतकर यांनी गव्हाची तर जोपासणा केलीच होती पण पाण्याचे योग्य नियोजन करुन संत्राची 550 झाडे बहरली होती. मात्र, गुरुवारी दुपारी उन्हाच्या झळा आणि शॉर्टसर्किटमुळे घडलेली दुर्घटना य़ामुळे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अंबाडी या गावांमधील संजय वडतकार यांच्या आगीचे लोट येत होते. यामध्ये न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
नुकासनभरपाईची मागणी
शेतामधील 100 ते 150 क्विंटल चा गहू त्याचबरोबर असलेली हिरवी गार संत्राची 550 झाडे संपूर्णता जळून खाक झाली. एवढेच नाही तर त्याचबरोबर शेतामधील स्प्रिंक्लर, पाईप शेतामध्ये असलेली केबल व शेती उपयुक्त साहित्य जळून खाक झाले आहे.महावितरण अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी कळकळीची विनंती ही पंचक्रोशीतल्या सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सर्व परिसरातील शेतकरी टोकाचे पाऊल उचलू व रस्त्यावर उतरु असा इशारा ही यावेळी दिला आहे.
संबंधित बातम्या :
Mango : निसर्गाच्या लहरीपणानंतर आता आंबा दरात घसरण, शेवटी नुकसान ते नुकसानच..!
Orchard Cultivation : फळबाग लागवड आता अधिक सोईस्कर, कमी क्षेत्रात जास्तीचा लाभ, नेमकी योजना काय?