धरण उशाला अन् कोरड घशाला : उजनी जलाशयालगतच्या केळी बागा जमिनदोस्त, नेमके कारण काय?

सध्या वातावरण निवळले आहे, मुबलक पाणीसाठा आणि केळीला चांगला दर असतानाही केळीच्या बागा संकटात आहेत. जिल्ह्यातील उजनी धरणालगतच्या जमिन क्षेत्रावर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केळी उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. वातावरणातील बदलामुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला पण यावर शेतकऱ्यांनी तोडगा काढून बागा जोपासल्या पण आता सर्वकाही सुरळीत असताना या भागातील विद्युत पुरवठाच महावितरणने खंडीत केला आहे.

धरण उशाला अन् कोरड घशाला : उजनी जलाशयालगतच्या केळी बागा जमिनदोस्त, नेमके कारण काय?
केळी बागा अंतिम टप्प्यात असताना सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 9:32 AM

सोलापूर : सध्या वातावरण निवळले आहे, मुबलक पाणीसाठा आणि केळीला चांगला दर असतानाही (Banana) केळीच्या बागा संकटात आहेत. जिल्ह्यातील (Ujani Dam) उजनी धरणालगतच्या जमिन क्षेत्रावर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केळी उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. वातावरणातील बदलामुळे (Disease on bananas) केळीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला पण यावर शेतकऱ्यांनी तोडगा काढून बागा जोपासल्या पण आता सर्वकाही सुरळीत असताना या भागातील विद्युत पुरवठाच महावितरणने खंडीत केला आहे. वाढत्या कृषीपंपावरील थकबाकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागा ह्या जमिन दोस्त होत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरणने तोंडचा घास हिसकावला

अनेक संकटाची शर्यत पार करीत केळी बागा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे अधिकचा खर्च करावा लागला होता. यातच पुन्हा वाढत्या थंडीमुळे दरात मोठी घट झाली होती. आता या समस्या मिटल्या आहेत तर महावितरणने गळचेपी केली आहे. उत्पादनावर झालेल्या खर्चामुळे वीजबिलाचे टप्पे पाडून देणे गरजेचे आहे. पण एकरकमी थकबाकी करण्याची सध्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. अशीच परस्थिती राहिली तर मेहनत वाया जाईलच पण केलेल्या खर्चाचे काय असा सवाल शेतकरी राजाभऊ तोडकरी यांनी उपस्थित केला आहे.

केळीच्या दरात सुधारणा

जानेवारी पर्यंत केळीचे दर घसरलेलेच होते. उत्पादनावरील वाढता खर्च, करप्याचा प्रादुर्भाव यामुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागा मोडीत काढल्या. आता कुठे ऊन्हाचा कडाका वाढल्याने दरात सुधारणा होत आहे. 900 ते 1100 रुपये क्विंटल केळीला दर आहे. या दरात विक्री झाली तरच चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहेत. पण महावितरणने ताठर भूमिका घेतली असून शेतकरी हा हतबल झाला आहे.

महावितरणची काय आहे भूमिका

सबंध राज्यात महावितरणकडून वसुली मोहीम सुरु आहे. अधिकतर थकबाकी ही कृषीपंपाकडेच आहे. दरवर्षी उत्पादन घेऊनही थकबाकी अदा करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. विद्युत पुरवठा खंडीत करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्या होत्या असे असतानाही शेतकऱ्यांनी कोणतीच भूमिका घेतलेले नाही. शेवटी महावितरणही शेतकऱ्यांची कंपनी आहे. तीचे अस्तित्व टिकवणे हे शेतकऱ्यांच्याच हाती आहे. त्यामुळे वाढत्या थकबाकीमुळे हा निर्णय घेतला असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

कापसाचे उत्पादन वाढले पण उत्पादकांचे स्वप्न हवेतच विरले, ‘कापूस ते कापड’ उपक्रमाचे काय झाले ?

Papaya : पपई लागवडीस पोषक वातावरण, कृषितज्ञांच्या 10 टीप्स वापरा अन् भरघोस उत्पादन मिळवा

हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय? हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी आवक

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.