Beed : आस्मानीनंतर आता सुलतानी संकट, पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय अन् पिकांचे नुकसान

दर 15 दिवसांतून एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना तर शेतकऱ्यांना करावाच लागत आहे. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते तर आता पिके जोमात असताना धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे होणारे नुकसान हे वेगळेच. आता हे कमी म्हणून की काय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Beed : आस्मानीनंतर आता सुलतानी संकट, पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय अन् पिकांचे नुकसान
बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय तर होत आहे शिवाय शेतात पाणा साचत असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:44 AM

बीड : दर 15 दिवसांतून एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना तर शेतकऱ्यांना करावाच लागत आहे. हंगामाच्या सुरवातीला (Untimely Rain) अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते तर आता पिके जोमात असताना धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे होणारे नुकसान हे वेगळेच. आता हे कमी म्हणून की काय (Beed Municipality) बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बीड शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. दरम्यान, मात्र, (Pipeline) पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पाण्याचा अपव्यय तर होतोच पण लगतच्या शेकडो एकरातील पिकांची नासाडी ही ठरलेलीच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असतानाही कायमचा तोडगा हा काढण्यात आलेला नाही. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू ही पिके बहरात असतानाच सातत्याने पाण्यात राहत असल्याने बुरशीजन्य रोगांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अधिकचा खर्च तर होतोच पण उत्पादनात घट होण्याचा धोका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेकडो एकरातील पिके पाण्यात

हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना पिकांना करावा लागत आहे. कधी अवकाळी तर कधी धुके यामुळे पिकांचे नुकसान तर होतच आहे. पण पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सातत्याने फुटत असल्याने वडवणी तालुक्यातील काडीवडगाव, देवडी या ठिकाणी पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वातावरणाती बदलामुळे शेतकऱ्यांनी किडनाशकाची फवारणी केली आहे. मात्र, शेतामध्ये पाणी साचत असल्याने औषध फवारणीचा काही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नैसर्गिक संकट तर आहेच पण वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा देखील सामना करावा लागत आहे.

सुचना देऊनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

पाईपलाईन फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही. याबाबत बीड नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांना वेळोवेळी सुचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायमस्वरुपी असा तोडगाच काढण्यात आलेला नाही. त्यामुळे वारंवार ही समस्या उद्भवत आहे. आतापर्यंत क्षेत्र रिकामे होते म्हणून काही नुकसान नव्हते पण आता रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच सातत्याने पाईपलाईन फुटत असल्याने नुकसान होत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि हरभरा ही पिके जोमात असतानाच नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे होत असलेले नुकसान पाहून तरी पाईपलाईनवर कायमस्वरुपी असा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेचं धोरण राहण्याची शक्यता

थकीत वीजबिल वसुलीसाठी ऊर्जा मंत्र्यांचा ‘मेगा प्लॅन’, 26 जानेवारीच्या निमित्ताने लोकप्रतिनीधींना केले आवाहन

Guidance to farmers : शेतकऱ्यांसाठी चालतं-फिरतं विद्यापीठ, कृषी सल्ल्यातून बदलले शेतकऱ्यांचे जीवनमान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.