Amravati : खरीप पिके पाण्यात, आता फळबागांवरही, पावसामुळे नेमका परिणाम काय?

हंगामात होणाऱ्या पावसावरच संत्रा फळ हे बहरत असते. पण यंदा पाऊस लागून राहिला आहे. गेल्या महिन्याभरात पावसाने खंडच दिलेला नाही. त्यामुळे अंबिया बहरातच फळगळती सुरु झाली आहे. फळ परिपक्व होण्यापूर्वीच ते गळून जमिनीवर पडत आहे. त्यामुळे उत्पादनाची आशा तर धूसर होत आहे पण बागा जोपासण्यासाठी केलेला खर्च तरी पदरात पडणार का नाही अशी सध्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड तालुक्यात संत्रा बागाचे क्षेत्र अधिक आहे.

Amravati : खरीप पिके पाण्यात, आता फळबागांवरही, पावसामुळे नेमका परिणाम काय?
सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा गळती होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झडाले आहे.
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 2:20 PM

अमरावती : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव हा परतीच्या पावसाच्या दरम्यान येत असतो. यंदा मात्र हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असा काय कहर केला आहे की, सर्वच पिके पाण्यात आहेत. आतापर्यंत पावसामुळे केवळ खरीप हंगातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. पण (Amravati) अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्यातील (Orange Growers) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत. अंबिया बहरात असलेल्या संत्रा बागांना (Fruit leakage) गळती लागलेली आहे. त्यामुळे फळबागायत शेतकऱ्यांचे न भरुन निघणार नुकसान होत आहे. आतापर्यंत खरीप पिके पाण्यात असल्याने वाढही खुंटली आहे आणि उत्पादनातील घटही निश्चित मानली जात आहे. या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. मात्र, पावसामुळे याचेही नुकसान अटळ होत आहे. त्यामुळे खरिपाचे तर नुकसान झालेच पण तीच अवस्था आता फळबागांचीही होत आहे.

सततच्या पावसामुळे फळगळती

हंगामात होणाऱ्या पावसावरच संत्रा फळ हे बहरत असते. पण यंदा पाऊस लागून राहिला आहे. गेल्या महिन्याभरात पावसाने खंडच दिलेला नाही. त्यामुळे अंबिया बहरातच फळगळती सुरु झाली आहे. फळ परिपक्व होण्यापूर्वीच ते गळून जमिनीवर पडत आहे. त्यामुळे उत्पादनाची आशा तर धूसर होत आहे पण बागा जोपासण्यासाठी केलेला खर्च तरी पदरात पडणार का नाही अशी सध्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड तालुक्यात संत्रा बागाचे क्षेत्र अधिक आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे संत्रा फळाचा बागेमध्ये सडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तब्बल 250 कोटींचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील संत्री ही प्रसिद्ध आहे. केवळ जिल्ह्यातच नाही देशातील मुख्य मार्केटमध्येही संत्रीला मागणी असते. यंदाही हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे विक्रमी उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पण जुलै महिन्यापासून संत्रा उत्पादकांच्या स्वप्नावर पाणी अशीच अवस्था आहे. सध्या बागा अंबिया बहरात असतानाच फळगळ सुरु झाल्याने तब्बल 250 कोटींचे नुकसान होईल असा अंदाज आहे. एकीकडे खरिपातील सर्वच पिके पाण्यात आहेत तर दुसरीकडे संत्रा फळगळती सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंबर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारी फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे. यंदा मात्र, सततच्या पावसामुळे संत्रा पीक पोसण्यापूर्वीच गळती सुरु झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.