Gadchiroli : नुकसान महाराष्ट्रातील पिकांचे, भरपाईची मागणी तेलंगणा सरकारकडे, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर
मेडीगट्टा धरणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अशीच स्थिती आहे. शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले तर पूरस्थितीमुळे शेत जमिनही खरडून गेली आहे. तेलंगणा सरकारमुळेच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
गडचिरोली : (Kharif Season) खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. पर्जन्यमान सरासरीएवढे झाले तर उत्पादनात वाढ होते. यंदा मात्र हाच पाऊस नुकसानीचा ठरत आहे. सरासरीपेक्षा अधिकच्या पावसामुळे तर राज्यातील बहुतांश (Dam Water Level) धरणे ही भरलेली आहेत. मेडीगट्टा धरणाची तर गोष्टच न्यारी झाली आहे. गेल्या 40 गडचिरोलीत जी पूरस्थिती निर्माण झाली नव्हती ती यंदा झाली आहे. मेडीगट्टा धरणात तेलंगणातून येणाऱ्या पाण्याची आवक आहे. तेलंगणा सरकारने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यानेच ही स्थिती ओढावत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गडचिरोलीतील (Crop Damage) पीक नुकसानीसाठी हे धरणच कारणीभूत ठरले असून नुकसान झालेले शेतीचे मदत महाराष्ट्र शासनाने द्यावी व भूसंपादनाची मदत तेलंगाना सरकारने द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.
तेलंगणा सरकारविरोधात घोषणाबाजी
मेडीगट्टा धरणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अशीच स्थिती आहे. शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले तर पूरस्थितीमुळे शेत जमिनही खरडून गेली आहे. तेलंगणा सरकारमुळेच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना यंदा खरिपात दुहेरी फटका बसलेला आहे. दरवर्षी मेडीगट्टा धरणामुळे नुकसान हे ठरलेलेच असते पण यंदा नुकसानीची तीव्रता वाढलेली आहे.
खरिपातील पिके गेली वाहून
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिके वाहून गेली आहेत. शेत शिवारात पाणी साचल्याने नुकसान तर झालेच पण धरणातील पाणी शेतामध्ये घुसल्याने पिकांसह जमिनही खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची देखील संधी मिळाली नाही. गडचिरोलीसह या भागात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून खरिपावर धोक्याची घंटा होती ती ऑगस्टच्या अंतिम टप्प्यातही कायम राहिलेली आहे. त्यामुळे खरीप पाण्यात अशीच स्थिती विदर्भात ओढावलेली आहे.
तहसील कार्यालयासमोर आंदोलन
धरणातील पाणी थांबवले तरी 20 गावे पाण्याखाली येतात आणि पाण्याचा विसर्ग केला तर 22 गावे पाण्याखाली येणार अशी गंभीर परिस्थिती मेडीगट्टा धरणामुळे निर्माण झाली होती. चाळीस वर्षात एवढा मोठा पूर कधी आलेला नाही मेडीगट्टा धरणामुळेच पुराचा फटका बसला आहे. नुकसान झालेले शेतीचे मदत महाराष्ट्र शासनाने द्यावी व भूसंपादनाची मदत तेलंगाना सरकारने द्यावी ही मागणी घेऊन अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.