दुष्काळात तेरावा : ‘ग्रीन गोल्ड’ने ‘ग्रेप डॅमेज’, 500 टन द्राक्ष मातीमोल..! नेमका काय प्रकार? वाचा सविस्तर

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झालेला आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारोंचा खर्च केला असताना हे संकट कमी म्हणून की काय आता द्राक्ष तोडणीच्या दरम्यानच द्राक्षाचे घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील बावी परिसरात समोर आला आहे.

दुष्काळात तेरावा : 'ग्रीन गोल्ड'ने 'ग्रेप डॅमेज', 500 टन द्राक्ष मातीमोल..! नेमका काय प्रकार? वाचा सविस्तर
रासायनिक खताचा वापरामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:14 AM

पंढरपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Vineyard) द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झालेला आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारोंचा खर्च केला असताना हे संकट कमी म्हणून की काय आता (Grape Cutting) द्राक्ष तोडणीच्या दरम्यानच द्राक्षाचे घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील बावी परिसरात समोर आला आहे. उत्पादन वाढीसाठी येथील शेतकऱ्यांनी ‘ग्रीन गोल्ड’ या (Chemical fertilizer) रासायनिक खताचा वापर केला होता. दरम्यान, या रासायनिक खताच्या फवारणीनंतरच द्राक्ष ही जळू लागली आहेत. एवढेच नाही तर रासयनिक खतांची प्रयोग शाळेत तपासणी केली असता, ती खते बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. बोगस खतांमुळे या परिसरातील 400 ते 500 टन द्राक्षाचे नुकसान झाले असून सुमारे दोन कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. संबंधीत खत कंपनी आणि दुकानदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी केंद्राविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

द्राक्ष तोडणीला आली असताना द्राक्ष फुगण्याच्या दृष्टीकोनातून माढा तालुक्यातील बावी येथील शेतकरी विजय मोरे, गणेश शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोंडनिब येथील एका कृषी केंद्रामधून ‘ग्रीन गोल्ड’ या कंपनीची विविध प्रकारची रासयनिक अन्नद्रवे खरेदी करुन ती द्राक्ष बागेसाठी वापरली होती. दरम्यान खतांचा वापर केल्यानंतर काढणीस आलेले द्राक्ष जळू लागल्याची बाब या शेतकऱ्यांनी लक्षात आली.शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.संबंधित खत दुकानातील खतांचे नमूने घेवून पुणे येथील शासकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी दिले होते. तपासणी आहवालामध्ये खतांमध्ये 70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आली.

दीड एकरातील 12 लाखाचे नुकसान

बावी येथील शेतकऱ्यांनी फवारलेल्या रासायनिक खतामध्ये घातक पदार्थ असल्याचे प्रयोगशाळेतूनच समोर आले आहे. येथील विजय मोरे यांनी दीड एकरामधील द्राक्षांसाठी हे रासायनिक खत वापरले होते. त्यामुळे संपूर्ण दीड एकरातील द्राक्षाचे नुकसान झाले आहे. या दीड एकरामध्ये 12 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते तर दुसरीकडे गणेश शिंदे यांचे 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार समोर असताना आता काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

20 शेतकऱ्यांचे नुकसान

बावी येथील 20 शेतकऱ्यांनी मोडनिंब येथील एका कृषी केंद्रातून या रासायनिक खताची खरेदी केली होती. उत्पादनवाढीसाठी याचा डोस द्राक्षांना दिला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण उत्पादन वाढ तर सोडाच आहे ते द्राक्षही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाहीत. तब्बल 20 शेतकऱ्यांनी या रासायिनक खताची मात्रा द्राक्षाला दिली होती. शिवाय खतामुळेच नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यावर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Pump : थकबाकी अदा करुनही विद्युत पुरवठा खंडीत, नांदेडमध्ये सरकारला घरचा आहेर..!

Mango : उन्हाळ्यात नव्हे तर पावसाळ्याच्या तोंडावर चाखा आता केसरची चव, कशामुळे ओढावली परस्थिती?

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.